ESIC Recruitment 2022: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO) पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार ESIC SSO भरती २०२२ साठी १२ एप्रिल २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू झाली आहे.

वायोमार्यदा काय?

अधिकृत अधिसूचनेनुसार, सामाजिक सुरक्षा अधिकारी पदांवर भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार)

पदांचा तपशील

या प्रक्रियेद्वारे सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या एकूण ९३ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ४३ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, ९ पदे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, ८ पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, २४ पदे इतर मागास प्रवर्गासाठी आणि ९ पदे आर्थिक दुर्बल घटकासाठी आहेत. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, संगणक कौशल्य चाचणी आणि वर्णनात्मक चाचणीच्या आधारे केली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

(हे ही वाचा: Recruitment 2022: बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी! पगार ८९ हजारांहून अधिक)

पगार किती?

या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ७ अंतर्गत ४४९०० रुपये ते १४२४०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. सर्व पात्र उमेदवार ESIC सामाजिक सुरक्षा अधिकारी भरती २०२२ साठी esic.nic.in या वेबसाइटवर १२ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना ५०० अर्ज शुल्क जमा करावे लागेल. ‌