कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO)/व्यवस्थापक Gr-II/अधीक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार esic.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: १२ मार्च २०२२

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १२ एप्रिल २०२२

फी भरण्याची शेवटची तारीख: १२ एप्रिल २०२२

(हे ही वाचः Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात भरती! दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी उत्तम संधी)

रिक्त जागांचा तपशील

पद: सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO)/ व्यवस्थापक Gr-II/ अधीक्षक

रिक्त पदांची संख्या: ९३

वेतनमान: ४४,९००ते १,४२,४००/- स्तर-७

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार)

श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील

यूआर (UR) : ४३

ओबीसी (OBC) : २४

अनुसूचित जाती (SC) : ०९

एसटी (ST): ०८

इडब्लू येस (EWS): ०९

एकूण: ९३

(हे ही वाचा: Recruitment 2022: बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी! पगार ८९ हजारांहून अधिक)

पात्रता निकष

केवळ तेच उमेदवार पात्र आहेत ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी आहे आणि ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान आहे.

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी भरती, महिला देखील करू शकतात अर्ज)

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावेत.

अर्ज फी

UR/OBC/EWS साठी: ५००/-

SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी: २५०/-

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार ESIC esic.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esic recruitment 2022 golden opportunity bumper recruitment salary more than 1 lakh ttg
First published on: 15-03-2022 at 09:14 IST