ESIS Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे इथे भरती; पगार ५० हजार रुपये

भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी थेट मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तारीख १८ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.

Job Alert News
नोकरीची संधी (फोटो: Pixabay)

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे (Maharashtra Employees State Insurance Society Hospital) इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी थेट मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तारीख १८ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.

कोणत्या पदांवर होणार भरती?

फिजिशियन ,जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता किती?

फिजिशियन (Physician),जनरल सर्जन (General Surgeon), ऑर्थोपेडिक (Orthopedic),स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) ,बालरोगतज्ञ (Pediatrician),वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदांसाठी उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आणि अनुभव असणं आवश्यक आहे.

( हे ही वाचा: Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दलात गट सी पदांसाठी भरती, दहावी उत्तीर्णांसाठीही नोकरीची संधी )

पगार किती?

फिजिशियन , जनरल सर्जन , ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ या पदांसाठी ५०,००० /- रुपये प्रतिमहिना पगार असेल. तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८५,००० रुपये प्रतिमहिना पगार असेल.

आवश्यक कागदपत्रं कोणती?

बायोडेटा (Resume) असणं आवश्यक आहे.

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं असणं गरजेचे आहेत.

शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) आवश्यक आहे.

ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा लायसन्स आवश्यक आहे.

पासपोर्ट साईझ फोटोही आवश्यक आहे.

( हे ही वाचा: स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी नवीन मारुती सेलेरियो कार भारतात लाँच! )

मुलाखतीचा पत्ता काय?

वैद्यकीय अधीक्षक ESIS रुग्णालय ठाणे हा मुलाखतीचा पत्ता आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या https://www.esic.nic.in/ या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Esis recruitment 2021 maharashtra employees state insurance hospital thane salary 50 thousand rupees ttg

Next Story
अभियंत्यांची फॅक्टरी!
ताज्या बातम्या