scorecardresearch

देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यामध्ये आता नावीन्यपूर्ण असे काही राहिलेले नाही.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यामध्ये आता नावीन्यपूर्ण असे काही राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेले शैक्षणिक आदानप्रदान पूर्वी होत असलेल्या व्यावसायिक देवाणघेवाणीएवढी सहज व सोपे बनले आहे. प्रत्येक देशामधून कितीतरी विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असतात. विद्यार्थ्यांच्या संबंधित शैक्षणिक विषयातील परदेशातील अनेक शासकीय व खासगी संस्थांनी पाठबळ दिल्याने उच्च शिक्षणासाठी हजारो शिष्यवृत्त्यादेखील उपलब्ध असतात. सर्वोत्तम जागतिक बुद्धिमत्तेला आपल्याकडे आकर्षति करण्याच्या हेतूने तरी निदान अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संशोधन संस्था प्रचंड प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारचे आíथक पाठबळ उपलब्ध करत असताना दिसतात. विद्यार्थ्यांना शिष्यावृत्त्यांशी निगडित सर्व प्रकारच्या बाबींचे निकष माहीत असणे खूप आवश्यक आहे. सदराच्या आजच्या या लेखात अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (मास्टर्स) उपलब्ध असलेल्या विविध देशांमधील शिष्यवृत्त्यांविषयी..

अमेरिकेतील ग्लोबल हेल्थ स्कॉलरशिप
आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये अभ्यास वा काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती म्हणजे एक खूप चांगली संधी आहे. अर्जदार पदवीधर असावा व त्याचा पदवीला असताना शोधनिबंध प्रकाशित झालेला असावा. हा शोधनिबंध जर एखाद्या विकसनशील देशातील जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत असेल तर त्या अर्जदाराला प्राधान्य देण्यात येईल. या शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.globalhealth.pitt.edu/

गुगलकडून महिलांसाठी अनिता बोर्ग मेमोरियल शिष्यवृत्ती २०१४-१५
अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ डॉ. अनिता बोर्ग यांचे तंत्रज्ञानातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ गुगलकडून दरवर्षी ही शिष्यवृत्ती माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञान क्षेत्रातील महिलांना दिली जाते. युरोप, मध्यपूर्व किंवा आफ्रिकेतील कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेल्या महिला उमेदवाराला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. अर्जदाराला दरवर्षी सुमारे ७ हजार युरो एवढे वार्षकि वेतन मिळेल.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ फेब्रुवारी २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.google.com/anitaborg/emea/index.html

स्कॉटलंड सरकारकडून उच्च शिक्षणासाठी यूकेमध्ये साल्टायर शिष्यवृत्ती
स्कॉटलंड सरकारकडून दिली जाणारी साल्टायर शिष्यवृत्ती ही स्कॉटलंड या देशाला एक नवे युरोपीयन शैक्षणिक केंद्र म्हणून निर्माण करणे या हेतूने सुरू करण्यात आलेली आहे. ही शिष्यवृत्ती फक्त कॅनडा, चीन, भारत व अमेरिका या चार देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. या शिष्यवृत्तीचे वैशिष्टय़ म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी, पदव्युत्तर किंवा पीएच.डी. यापकी कोणत्याही प्रकारच्या उच्चशिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तींची एकूण संख्या २०० आहे. शिक्षणाच्या कालावधीदरम्यान स्कॉटिश सरकारकडून आवश्यक टय़ुशन फी, निवासी भत्ता व विमा यांसारखी आíथक मदत केली जाणार आहे. साल्टायर शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.scotland.org/index.php/study-in-scotland/scholarships/saltire-scholarships

ऑस्ट्रेलियामध्ये कायद्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती
ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाकडून कायदा विषयातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ज्युरीज डॉक्टर शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत न्यू कॅसल विद्यापीठाच्या लॉ स्कूलकडून २०१४ मधील प्रवेशासाठी एकूण पाच शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत. शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी
२०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.newcastle.edu.au/scholarships/BUSLAW_015

केएसपी एक्सलन्स पदव्युत्तर स्कॉलरशिप
Foundation for the Advancement of Sciences (KFAS) या संस्थेकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. मध्यपूर्व आशिया व अरब जगतातील घडामोडींचा अभ्यास केला जावा या हेतूने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. सामाजिक विज्ञान व मानववंशशास्त्र या शाखेतील किंवा शाखेशी संबंधित विद्यार्थ्यांना अरब जगतातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा असून दरवर्षी जवळपास १० हजार युरोपर्यंत निधीचा समावेश असेल अशा अनेक शिष्यवृत्त्या संस्थेकडून देण्यात येतात. शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ फेब्रुवारी २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.sciencespo.fr
 ऑल द बेस्ट !
itsprathamesh@gmail.com
(समाप्त)      

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Foreign scholarships

ताज्या बातम्या