फूड सेफ्टी किंवा एफएसएसएआय मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था, एकूण २५४ गट अ आणि इतर पदांवर थेट भरतीसाठी दोन स्वतंत्र भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. यातील ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्राधिकरणाने जारी केलेली जाहिरात क्र. DR-03/2021 नुसार, सहाय्यक संचालक आणि उपव्यवस्थापकाच्या एकूण २१ पदांची भरती करायची आहे. त्याचप्रमाणे दुसरी भरती जाहिरात क्र. DR-04/2021 नुसार, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (CFSO), सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक आणि इतरांच्या एकूण २३३ पदांची भरती करण्यात येत आहे.

रिक्त पदांचा तपशील

प्रधान व्यवस्थापक- ०१ पद

सहाय्यक संचालक – १५ पदे

उपव्यवस्थापक- ०५ पदे

अन्न विश्लेषक- ०४ पदे

तांत्रिक अधिकारी- १२५ पदे

केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी- ३७ पदे

सहाय्यक व्यवस्थापक IT- ०४ पदे

सहाय्यक व्यवस्थापक- ०४ पदे

सहाय्यक- ३३ पदे

हिंदी अनुवादक- ०१ पद

वैयक्तिक सहाय्यक – १९ पदे

आयटी सहाय्यक- ०३ पदे

कनिष्ठ सहाय्यक- ०३ पदे

याप्रमाणे करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. याकरिता FSSAI च्या अधिकृत fssai.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार असून उमेदवार ७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील.

अर्ज शुल्क

एफएसएसएआय भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी १५०० रुपये आहे. तर SC, ST, महिला, माजी सैनिक, दिव्यांग आणि EWS यांना अर्ज शुल्क फक्त ५०० रुपये भरावे लागणार असून त्यांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सूट दिली जाते. ऑनलाईन माध्यमातून फी भरता येते.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सहाय्यक संचालक – या पदासाठी, उमेदवाराने संबंधित क्षेत्रात मास्टर्स / बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच पाच-सहा वर्षांचा कामाचा अनुभव देखील आवश्यक आहे.

डेप्युटी मॅनेजर- या पदाकरिता जर्नालिझम मध्ये डिप्लोमा केलेला असावा किंवा पब्लिक रिलेशनमध्ये एमबीए ही पदवी असणे आवश्यक आहे.

अन्न विश्लेषक- रसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे.

तांत्रिक अधिकारी – केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे.

केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी- अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

सहाय्यक व्यवस्थापक IT- B.Tech किंवा M.Tech in Computer Science मधून पदवीधर असणे आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर- जर्नालिझम मधून पीजी डिप्लोमा केलेली पदवी आवश्यक आहे.

हाय्यक – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

हिंदी अनुवादक- पदवी स्तरावर इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर्स असणे आवश्यक आहे.

पर्सनल असिस्टंट – बॅचलर पदवी बरोबरच कमीत कमी ८० w.p.m. च्या दराने आणि ४० w.p.m च्या दराने इंग्रजी किंवा ३५ w.p.m च्या दराने हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे.

आयटी सहाय्यक – संगणकामध्ये एक वर्षाचा पीजी डिप्लोमासह बॅचलर पदवी आवश्यक आहे.

कनिष्ठ सहाय्यक – 10 वी पास असणे आवश्यक आहे.