JEE Main 2023:  जेईई मेन परीक्षेच्या जानेवारी २०२३ सत्रासाठी एकूण ८.६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये जुलै २०२२ तुलनेत ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ६ लाखांहून अधिक म्हणजे जवळपास ७० टक्के नोंदणी पुरुष उमेदवारांची आहे. त्यामुळे या परीक्षेच्या नोंदनीमध्ये पुरुषांचे वर्चस्व कायम आहे. मात्र, या परिक्षेसाठी पहिल्यांदाच ३० टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जी २०२२ च्या तुलनेत किरकोळ वाढ म्हणजेच २.५ लाख ते २.६ लाख इतकी आहे..

प्रवर्गानुसार, सर्वसाधारण उमेदवारांची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१.८ टक्क्यांवरुन ३८.३ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. दुसरीकडे, ओबीसी उमेदवारांची संख्या ३५.७ टक्क्यांवरुन ३७.१ टक्क्यांवर गेली आहे, तर सामान्य-आर्थिकदृष्ट्या दुर्बल (GEN-EWS) उमेदवारांची संख्याही ९% टक्क्यांवरुन ११.६% टक्के इतकी वाढली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा- LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३०० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

महाराष्ट्र आघाडीवर –

राज्यानुसार या उमेदवार नोंदनीमध्ये, १ लाख ३ हजार ३९ म्हणजेच एकूण नोंदणीच्या जवळपास १२ टक्क्यांनी महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश ९९ हजार ७१४ (११.६%) आणि आंध्र प्रदेश ९१ हजार ७९९ (१०.६%) इतकी नोंदनी झाली आहे. तर तेलंगणा ८६ हजार ८४० आणि राजस्थानमधून ५९ हजार ४४१ उमेदवारांची नोंद झाली आहे. वरील राज्य वगळता इतर राज्यातील नोंदनी ही ५० हजारांपेक्षा कमी आहे.

शहरांच्या आकडेवारीनुसार दिल्ली ३६,५३० उमेदवारांसह आघाडीवर आहे, त्यानंतर हैदराबाद/सिकंदराबाद (३२,२४६) आणि कोटा (२४,२५३) अशी अनुक्रमे आहेत. एनआयटी आणि आयआयआयटी सारख्या केंद्रीय अनुदानीत संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग अंडरग्रेजुएट जेईई (अॅडव्हान्स) प्रवेश पात्रता परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा- Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

भारताबाहेरील १८ शहरांमध्ये होणार परीक्षा-

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने डिसेंबर रोजी दिलेल्या सूचनेमध्ये ३१ जानेवारी ही परीक्षेची शेवटची तारीख असल्याचे सांगितले होते, तर शनिवारी जारी केलेल्या नवीन सुचनेमध्ये २७ जानेवारी रोजी कोणतीही परीक्षा होणार नसून १ फेब्रुवारी रोजी पेपर १ (BTech/ BE programmes) होईल असं सांगण्याच आलं आहे.

NTA नुसार, ही टेस्ट देशातील २९० शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १८ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ज्यामध्ये वॉशिंग्टन डीसी, मॉस्को, हाँगकाँग, सिंगापूर आणि दुबईसह अनेक देशांचा सहभाग आहे. शिवाय इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.

संगणक-आधारित MCQ (पेपर ३ वगळता) प्रत्येक दिवशी दोन सत्रांमध्ये परिक्षा घेतली जाईल. पेपर १ बीटेक/बीई प्रोग्रामसाठी, पेपर २ आर्किटेक्चर बॅचलरसाठी (Bachelor’s in architecture) आणि पेपर ३ बॅचलर इन प्लॅनिंगसाठी (Bachelors in planning. ) आहे. तर एकूण उमेदवारांपैकी २१,५५१ जणांनी पेपर १ आणि २ या दोन्हीसाठी नोंदणी केली आहे. तर तीन्ही पेपरसाठी १६,७८० उमेदवारांनी नोंदणी केली असून पेपर १ साठी ८.२ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तर JEE (Main) चे दुसरे सत्र ६ ते १२ एप्रिल २०२३ या कालावधीत पार पडणार आहे.

Story img Loader