Golden job opportunities in SBI for graduates; Recruitment for 1673 Vacancies Salary above 60k, know more details | Loksatta

पदवीधरांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १६७३ जागांसाठी भरती तर पगार ६० हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या अधिक तपशील

स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

पदवीधरांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १६७३ जागांसाठी भरती तर पगार ६० हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या अधिक तपशील
स्टेट बँक ऑफ इंडिया पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. (प्रातिनिधिक फोटो)

SBI PO Vacancy: स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार पीओच्या एकूण १६७३ जागांवर भरती केली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. यासाठी, उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच २२ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जावे
  • वेबसाइटच्या होम पेजवर Whats New च्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म 2022 फॉर 1673 पोस्ट’ या लिंकवर जा.
  • आता ‘क्लिक हिअर तो अप्लाय’ या पर्यायावर जा.
  • पुढील पानावर विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुम्ही नोंदणी क्रमांकाद्वारे अर्ज भरू शकता.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला मिळणार ५५ हजारांहून अधिक पगार

एसबीआय पीओ भरती २०२२

  • अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू – २२ सप्टेंबर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर
  • प्राथमिक परीक्षा – १७ ते २० डिसेंबर २०२२

पात्रता आणि वय

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त आणि ३० वर्षांपेक्षा कमी असावे. या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून ६३,८४० रुपये प्रति महिना वेतन मिळेल. याशिवाय त्यांना अनेक प्रकारच्या भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा : मृदा घटक

संबंधित बातम्या

तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे का? याचा शरीरावर काय परिणाम होतो लगेच जाणून घ्या
युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब
Moto Edge 20 आणि Edge 20 Fusion भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत
तेकलट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ स्किनकेअर सोल्यूशन वापरून नक्की पाहा !
Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
कर्तव्यपालनास प्राधान्य द्या!; संविधानदिनी पंतप्रधान मोदींचे आवाहन
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा