ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्ती वेगाने वाढत आहे. सॉफ्टवेअर, व्यवस्थापन, वित्तीय  शाखांमधील पदवीधरांसाठी या क्षेत्रात कामाच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर माहिती-
भारतातील ग्राहकांची ऑनलाइन व्यवहार करण्याची मानसिकता मोठय़ा प्रमाणावर दिवसेंदिवस वाढत आहे. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतातील ई-कॉमर्स व्यवहारांमधील वाढ २०१३ साली ८८ ते ८९ टक्के इतकी प्रचंड होती. आíथक मंदी असतानाही ही वाढ झाली, हे लक्षणीय मानले जाते. ‘क्रिसिल’ या अर्थविषयक नामवंत संस्थेच्या मते, पुढील तीन वर्षांत देशातील ई-कॉमर्स व्यवहार ५० ते ५५ टक्के गतीने वाढण्याची शक्यता आहे. २०१६ पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल ५५ हजार कोटी रुपयांची होऊ शकते.
ई-कॉमर्स हे जलद गतीने वाढणारे आणि विकसित होणारे नवे क्षेत्र असून या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. तांत्रिक कौशल्य आणि सर्जनशीलता असणाऱ्या उत्साही युवावर्गाला या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात. पुढील दोन-तीन वर्षांत किमान ५० हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. देशातील नामवंत बिझनेस स्कूल्स आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल ई-कॉमर्स व्यवहार करणाऱ्या कंपन्यांकडे दिसून येत आहे.

करिअर संधी
या क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण वेब अॅप विकसित करू शकणारे तज्ज्ञ, ग्राफिक डिझायनर्स आणि कंटेन्ट रायटर्स, डिजिटल मार्केटर्स, सप्लाय चेन, प्रॉफिट मॅनेजमेंट, कस्टमर अॅक्विझिशन, ग्राहक सेवा, दरनिश्चिती आणि विविध प्रकारच्या विक्री व्यवस्था बघणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासते. ऑनलाइन खरेदीची मानसिकता असलेल्या ग्राहकांच्या सतत बदलत्या कलांचा शोध घेऊन त्यानुसार कार्यरत होऊ शकणाऱ्या आणि उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या युवावर्गाला या क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते.

bank of barod state bank of india
सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे कर्ज महाग! स्टेट बँक, बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ
pli scheme to boost job creation
‘पीएलआय’च्या धर्तीवर रोजगारवाढीशी संलग्न प्रोत्साहनपर तरतुदी अर्थसंकल्पात आवश्यक – आयएमसी
wedding card, environmental conservation,
अंबानींची लग्नपत्रिका असेल वेगळी, पण चर्चा मात्र ‘या’ लग्नपत्रिकेचीच
Services sector performance expanded in June
जूनमध्ये सेवा क्षेत्राच्या कामगिरीत विस्तार
DSP Mutual Fund
पुढील दशक उत्पादन क्षेत्राचे, डीएसपी म्युच्युअल फंडाचा आशावाद
Sell Tur Buy TCS share, prediction of good returns in tcs, may decrease in tur price, Strategic Investment, Strategic Investment in Sell Tur Buy TCS share, tcs promising returns, share market, commodity market, decrease in tur price, finance article, marathi finance article, tcs share,
क…कमॉडिटीचा : तूर विका, टीसीएस घ्या
indo Bangladesh Maritime Cooperation Efforts to strengthen ties with the financial maritime business sector
भारत-बांगलादेश सागरी सहकार्य; आर्थिक, समुद्री व्यवसाय क्षेत्राशी संबंध वाढवण्याचे प्रयत्न
How many registrations for Technical Diploma Course this year
तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा किती नोंदणी… कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आवश्यक कौशल्ये
या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणवर्गाला विविध प्रकारची आव्हाने स्वीकारण्याची क्षमता अंगी बाणवावी लागेल. सध्या या क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची निवड काळजीपूर्वक आणि वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे केली जाते. हे क्षेत्र नवे असल्याने त्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य, मानसिक क्षमता संबंधित उमेदवाराकडे आहे किंवा नाही याची विशेष चाचणी केली जाते. त्यांचा अॅप्टिटय़ूड तपासला जातो.
ई-कॉमर्सचा व्यवहार हा व्हच्र्युअली म्हणजेच संगणकाद्वारेच होत असल्याने यामध्ये अधिकाधिक सर्जनशीलतेला महत्त्व आहे. नावीन्यपूर्ण बाबींचा सतत शोध लावून आणि त्याचा उपयोग करत अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये उतरलेल्या कंपन्या करत आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांना सर्जनशील व्यक्तींची अधिकाधिक गरज भासणार आहे. ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये काम करताना विशिष्ट टीमसोबत काम करावे लागते. त्यासाठी टीममधील प्रत्येकजण सक्षम असणे गरजेचे असते. ही सक्षमता संभाव्य उमेदवारांमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी विविध चाचण्यांद्वारे केली जाते.
या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक अर्हतेमध्ये त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानातील कौशल्य, व्यवस्थापन शाखेचे ज्ञान आणि वित्तीय बाबींवर प्रभुत्व अशा गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. अभियांत्रिकेच्या शिक्षणानंतर दर्जेदार बिझनेस स्कूलमधील एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रवेश करणे तुलनेने सुकर असते.
ई-कॉमर्समध्ये ऑनलाइन दुकानातून कार्यक्षमतेने व्यवहार होत असतात. त्यामुळे वित्तीय बाबींच्या ज्ञानासोबतच ई-कॉमर्स अॅनालिस्ट, वेब डिझाइन आणि प्रशासकीय बाबींचे ज्ञान आवश्यक असते. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना यापकी कोणत्याही क्षेत्राची निवड करता येईल.
ई-कॉमर्स मार्केटिंग अॅनालिस्ट म्हणून जबाबदारी पार पाडताना तुमच्याकडे असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कौशल्यांचा प्रामुख्याने उपयोग करावा लागतो. व्यवसाय व्यवस्थापन आणि विपणनाची (मार्केटिंग) सूत्रे योग्यरीत्या या तंत्रज्ञानात गुंफता येणे गरजेचे असते. ई-कॉमर्सच्या यशस्वितेसाठी कंपनीचे संकेतस्थळ सतत अपडेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी या विषयातील तज्ज्ञांना सजग राहावे लागते. ग्राहकांच्या व्यावसायिक इच्छा आणि आकांक्षाचे तात्काळ विश्लेषण करून त्या डिझाइन चमूकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याची जबाबदारीसुद्धा या तज्ज्ञांना पार पाडावी लागते. बाजारपेठेतील चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे, स्पर्धेतल्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहारांची दखल घेणे, जाहिरातदारांसोबत समन्वय साधणे आणि ग्राहकांच्या पसंतीचा कल लक्षात घेत त्यानुसार योजना राबवण्याचे तंत्र या क्षेत्रातील कंपन्यांना जमावे लागते.
वेब डिझायनर्स क्षेत्रातील व्यक्ती या ई-कॉमर्सच्या व्यवहारातील सर्जनशील बाजू सांभाळणाऱ्या असतात. या तज्ज्ञांना ग्राफिक्स, संगणकीय प्रोग्राम, मल्टिमीडिया आणि डिझाइनचे कौशल्य वापरून कंपनीच्या संकेतस्थळावर ग्राहकांचे लक्ष कसे खिळून राहील, हे बघावे लागते. संकेतस्थळाची उपयुक्तता सातत्याने सिद्ध करण्यासोबतच या तज्ज्ञांना व्यवस्थापनाशी समन्वय साधत संकेतस्थळाचा प्रवाहीपणा वा जिवंतपणा कायम ठेवावा लागतो.
वेब अॅडमिनिस्ट्रेटर हे संस्थेच्या संकेतस्थळाची दैनंदिन देखभाल कार्यक्षमतेने करणारे तंत्रज्ञ असतात. या तज्ज्ञांकडे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे ज्ञान असणे गरजेचे असते. या तज्ज्ञांना संकेतस्थळ सतत अपडेट ठेवावे लागते. तांत्रिक समस्यांचे तात्काळ निराकरण करणे हे या तज्ज्ञांचे मुख्य काम आहे. संस्थेचा संपूर्ण डाटा सुरक्षित ठेवणे, या डाटाची देखभाल करणे, एखादे वेळेस हा डाटा नष्ट झाल्यास तो परत मिळवणे ही कामे या तज्ज्ञांना करावी लागतात. काही वेब अॅडमिनिस्ट्रेटरकडे संकेतस्थळाच्या नूतनीकरणाचे कामसुद्धा सोपवले जाते.

अभ्यासक्रम
ई-कॉमर्समध्ये करिअर करण्यासाठी स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम अद्याप मोठय़ा प्रमाणात विकसित झाले नसले तरी माहिती तंत्रज्ञानाच्या कौशल्यासह वाणिज्य शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए फायनान्स, एमबीए मार्केटिंग या विषयांतील उमेदवारांना विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
ई-कॉमर्सचा व्यवहार हा डिजिटली म्हणजे संगणकाद्वारेच होत असल्याने माहिती तंत्रज्ञातील विविध तंत्रांना अवगत करणे उपयुक्त ठरू शकते.
० बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इन कॉमर्स: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, टपाल पेटी क्रमांक ८०, जळगाव-४२५००१.
० एम.कॉम. इन ई-कॉमर्स : पुणे विद्यापीठ. अर्हता- खुल्या संवर्गासाठी बी.कॉम.मध्ये ५० टक्के गुण आणि राखीव संवर्गासाठी ४५ टक्के गुण. विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेतील गुणांवर केली जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे.
० सर्टििफकेट कोर्स इन ई-कॉमर्स : पुणे विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांतील मुलांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठ, गणेश िखड,
पुणे- ४११००७
० मास्टर ऑफ कॉमर्स इन ई-कॉमर्स : मुंबई विद्यापीठ.  कालावधी दोन वष्रे. अर्हता- बी.कॉम. खुल्या संवर्गासाठी ५० टक्के गुण आवश्यक आणि राखीव संवर्गासाठी ४५ टक्के गुण आवश्यक.
० डिप्लोमा इन ई कॉमर्स अॅण्ड फायनान्शिअल अकाऊंटिंग अॅण्ड मॅनेजमेंट : कालावधी- चार महिने.
अर्हता- बारावी उत्तीर्ण. पत्ता- फॅकल्टी ऑफ कॉमर्स, मुंबई विद्यापीठ, कलिना, सांताक्रुझ, मुंबई.
ई-कॉमर्स व्यवहारातील करिअरसाठी डिजिटल मार्केटिंग म्हणजेच इंटरनेटद्वारे विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य व तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन शाखेतील अभ्यासक्रमांमध्ये या बाबींचा समावेश केला जातो. त्याद्वारे तांत्रिक कौशल्य आणि इंटरनेट विक्रीसाठी लागणारे भाषा कौशल्य अवगत होऊ शकते.

करिअर संधी
ई-कॉमर्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इंटरअॅक्टिव्ह किंवा डायरेक्टर अॅडव्हर्टायिजग मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, डिजिटल बिझनेस मॅनेजर, डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्ह, इंटरनेट मार्केटिंग स्पेशालिस्ट, सप्लाय चेन मॅनेजर, बिझनेस टू बिझेनस मार्केटिंग मॅनेजर, कन्सल्टंट आदी करिअरच्या संधी मिळू शकतात.