scorecardresearch

दहावी उत्तीर्णांसाठी भारतीय सेनेत नोकरीची मोठी संधी; या पदांसाठी होणार भरती

सर्व इच्छूक उमेदवार भारतीय सेना एमटीएस भरती २०२२ साठी ११ मार्च २०२२ पर्यंत किंवा त्याआधी ओंलीने अर्ज दाखल करू शकतात.

indian army recruitment
या मोहिमेअंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफच्या एकूण ७ पदांवर भरती केली जाईल. (प्रातिनिधिक फोटो)

Indian Army Recruitment 2022: एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (लष्कर) कॅम्पने मल्टी टास्किंग स्टाफच्या पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छूक उमेदवार भारतीय सेना एमटीएस भरती २०२२ साठी ११ मार्च २०२२ पर्यंत किंवा त्याआधी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी १९ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिसूचनेनुसार, या मोहिमेअंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफच्या एकूण ७ पदांवर भरती केली जाईल. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ पदे आणि इतर मागासवर्गीयांसाठी २ पदे समाविष्ट आहेत. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर एक अंतर्गत दरमहा रु. १८ हजारपर्यंत वेतन दिले जाईल.

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचं लिखाणाकडे दुर्लक्ष झालंय? चिंता नको अशी लावा लेखनाची सवय

मल्टी टास्किंग स्टाफच्या पदावरील भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सरकारी नियमांनुसार ओबीसी उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट असेल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा, वैद्यकीय तपासणी, कागदपत्र पडताळणीवर मुलाखत या आधारे निवड केली जाईल. सर्व पात्र उमेदवार मल्टी टास्किंग स्टाफ भरती २०२२ साठी विहित नमुन्यात त्यांचे अर्ज इतर आवश्यक कागदपत्रांसह ११ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Great job opportunity in indian army for 10th pass pvp

ताज्या बातम्या