रिझर्व्ह बँकेत आता इंटर्नशिपसाठी मोठी संधी उपलब्ध, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

इंटर्नशिपद्वारे एकूण १२५ इंटर्न निवडले जातील. ही इंटर्नशिप एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल.

lifestyle
निवडलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये मुलाखत घेतली जाईल.(photo: indian express)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. वास्तविक पाहता आरबीआयने वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत नोकरीच्या शोधात असलेले तरुण रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे यामध्ये देशासह परदेशात राहणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील इंटर्नशिप अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त यासह अनेक क्षेत्रात अर्ज करू शकतात. या उत्तम संधीकरिता rbi.org.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज केले जाऊ शकतात.

या इंटर्नशिपद्वारे एकूण १२५ इंटर्न निवडले जातील. ही इंटर्नशिप एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल. निवडलेल्या इंटर्नला फक्त मुंबई स्थित बँकेच्या केंद्रीय कार्यालय विभागांमध्ये प्रकल्प हाती घेणे आवश्यक असणार आहे.

या पत्यावर पाठवा अर्ज

परदेशी विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा लागेल. अर्जाचा फॉर्म मुख्य महाव्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), केंद्रीय कार्यालय, २१ वा मजला, मध्यवर्ती कार्यालय इमारत, शहीद भगतसिंग रोड, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. यासह आगाऊ प्रत cgminchrmd@rbi.org.in या ई-मेलवर पाठवता येईल.

अर्ज करण्याची पात्रता आणि निवड प्रक्रिया

व्यवस्थापन, वाणिज्य, सांख्यिकी, कायदा, अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

तीन वर्षांची व्यावसायिक पदवी पूर्ण केलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

मॅनेजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ इत्यादी विषयांचे शिक्षण घेत असलेले परदेशी विद्यार्थी अर्ज करू शकतात.

अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

निवडलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये मुलाखत घेतली जाईल.

अंतिम निकाल मार्च २०२२ मध्ये घोषित केले जातील.

अधिक माहितीसाठी, तुम्ही chances.rbi.org.in.या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Great opportunity for internship now available at rbi know the whole process scsm

Next Story
रोजगार संधी
ताज्या बातम्या