डून युनिव्हर्सिटी – देहराडून येथे पर्यावरण विज्ञान व संरक्षणविषयक उपलब्ध असणाऱ्या खालील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
एमएस्सी- नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट : उपलब्ध जागा २०.
आवश्यक पात्रता- अर्जदारांनी बायोलॉजिकल अथवा अप्लाइड सायन्सेस विषयातील पदवी घेतलेली असावी.
एमएस्सी- एन्व्हायरॉनमेंटल स्टडीज : अर्जदारांनी विज्ञान वा अप्लाइड सायन्स विषयांसह पदवी घेतलेली असावी. उपलब्ध जागा २०.
एमटेक- एन्व्हॉयरॉन्मेंटल टेक्नॉलॉजी  : उपलब्ध जागा २०.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी बीटेक वा एमएस्सी पात्रता पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, प्राणिशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र वा वनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वरील अभ्यासक्रमांसाठी अर्जदारांच्या गुणांची टक्केवारी ते सर्वसाधारण गटातील असल्यास कमीत कमी ५० टक्के व राखीव गटातील असल्यास कमीत कमी ४५ टक्के असणे आवश्यक आहे.
एन्व्हॉयरॉनमेंटल सायन्समधील संशोधनपर पीएचडी : उपलब्ध जागा पाच.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी पर्यावरणशास्त्र वा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ‘टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी सीएसआयआर, युजीसी, सीएमआर, डीबीटी अथवा इन्स्पायर यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारकांना लेखी निवड परीक्षेसाठी देशांतर्गत विविध केंद्रांवर लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. अर्जदारांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ६५० रु.चा डून युनिव्हर्सिटी- देहराडून यांच्या नावे असणारा व देहराडून येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
 अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी डून युनिव्हर्सिटी- देहराडूनच्या दूरध्वनी क्र. ०१३५- २५३३१०५ वर संपर्क साधावा, अथवा http//doonuniversictyac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि को-ऑर्डिनेटर ऑफ अ‍ॅडमिशन, डून युनिव्हर्सिटी, केदारपूर, अजाबपूर, देहराडून (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ जून २०१३.