प्रश्नवेध एमपीएससी : गट क संयुक्त पूर्वपरीक्षा

सामान्य विज्ञान सराव प्रश्न

(संग्रहित छायाचित्र)

सामान्य विज्ञान सराव प्रश्न

रोहिणी शहा

*   प्रश्न १. पुढील विधाने विचारात घ्या.

अ.   बटाटे साठवून ठेवण्यासाठी गॅमा किरणांचा वापर करतात.

ब.   कांदे साठवून ठेवण्यासाठी गॅमा किरणांचा वापर करतात.

क.   गॅमा किरण हे उड-६० या समस्थानिकापासून मिळवतात.

ड.   गॅमा किरणे आयनीभवन घडवून आणणारी प्रावरणे आहेत.

वरीलपकी योग्य विधान/ने कोणते/ती?

१) अ, ब आणि क

२) ब, क, आणि ड

३) अ, क आणि ड

४) वरील सर्व

*    प्रश्न २. एका विद्युत परिपथामध्ये ३५ ओहम, १७ ओहम, ३३ ओहम आणि ११ओहम असे विद्युतरोध एकसर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. तर त्या परिपथातील एकूण परिणामी विद्युतरोध किती?

१) ६१ ओहम    २) ९६ ओहम

३) ५२ ओहम    ४) ८० ओहम

*    प्रश्न ३. पुढीलपकी कोणत्या आनुवंशिक रोगामध्ये ४५ गुणसूत्रे आढळतात?

१) डाउन्स सिन्ड्रोम

२) क्लीन्फेल्टर्स सिंड्रोम

३) टर्नर्स सिंड्रोम

४) वरीलपकी नाही

*    प्रश्न ४. खालील विधाने विचारात घ्या.

अ. बाष्पीभवनाचा दर हा तापमान, क्षेत्रफळ, आर्द्रता आणि दाब यावर अवलंबून असतो.

ब.   बंदिस्त भांडय़ातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग हा उघडय़ा भांडय़ातील पाण्याच्या बाष्पीभवनाच्या वेगापेक्षा कमी असतो.

क.   पाण्याचा उत्कलनांक त्याच्या बाष्पीभवन बिंदूपेक्षा जास्त आहे.

वरील विधानांमधून अयोग्य विधान निवडा.

१) अ सोडून सर्व  २) ब सोडून सर्व  ३) क सोडून सर्व  ४) वरील सर्व

*    प्रश्न ५. पुढीलपकी कोणत्या सृष्टीमध्ये लंगिक प्रजन, मियॉसिस व मायटॉसिस या प्रक्रिया घडून येत नाहीत?

१) सृष्टी मोनेरा

२) सृष्टी प्रोटीस्टा

३) सृष्टी फन्जाय

४) सृष्टी मोलुस्का

*    प्रश्न ६. पुढीलपकी मूलद्रव्यांचे प्रकार आणि त्यांचे वैशिष्टय़ यांची कोणती जोडी योग्य आहे?

१)   आयसोबार – समान अणूभार पण असमान अणूअंक

२)   आयसोटोप – समान अणू अंक पण असमान अणुभारांक

३)   आयसोटोन – न्यूट्रॉनव्ही संख्या समान पण इलेक्ट्रॉनची संख्या असमान

४)   आयसोमर – समान संरचना सूत्र पण असमान रेणूसूत्र

*    प्रश्न ७. पुढील विधानांचा विचार करा

अ.   दृष्य प्रकाश, अवरक्त तरंग, मायक्रोवेव्ह, रेडिओ लहरी हे आयनीभवन करणाऱ्या प्रारणांचे प्रकार आहेत.

ब.   अतिनील किरणे, क्ष किरण, गॅमा किरण हे आयनीभवन न करणाऱ्या प्रारणांचे प्रकार आहेत.

क.   आयनीभवन न करणारी प्रारणे मनुष्याला हानीकारक असतात.

ड.   आयनीभवन करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोन्ही प्रारणांना विद्युत चुंबकीय प्रारणे असेही म्हणतात.

वरीलपकी योग्य विधान निवडा

१) अ सोडून सर्व

२) ब सोडून सर्व

३) क सोडून सर्व

४) ड सोडून सर्व

*    प्रश्न ८. पुढील मूलद्रव्यांची मांडणी रासायनिक अभिक्रियांमधील सक्रियतेच्या प्रमाणानुसार चढत्या क्रमाने करा.

१)   सोने, तांबे, झिंक, अ‍ॅल्युमिनियम, पोटॅशियम

२) सोने, अ‍ॅल्युमिनियम, पोटॅशियम, तांबे, झिंक

३) पोटॉशियम, अ‍ॅल्युमिनियम, झिंक, तांबे, सोने

४) झिंक, तांबे, अ‍ॅल्युमिनियम, पोटॅशियम, सोने

उत्तरे आणि स्पष्टीकरणे

प्रश्न क्रमांक. १ – योग्य पर्याय क्र. (४)

प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र.(2)

प्र.क्र. ३ – योग्य पर्याय क्र.(३)

प्र. क्र. ४ – योग्य पर्याय क्र.(3)

प्र.क्र. ५ – योग्य पर्याय क्र.(१)

प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(३)

आयसोटोन- न्यूट्रॉनव्ही संख्या समान पण इलेक्ट्रॉनची संख्या असमान

*   प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र.(४)

म्हणजेच प्रश्नातील ड हा पर्याय सोडून इतर तिन्ही पर्याय योग्य आहेत.

दृष्य प्रकाश, अवरक्त तरंग, मायक्रो वेव्ह, रेडिओ लहरी व कमी तरंगलांबीची किरणे ही अणूंचे आयनीभवन करू शकत नाहीत. क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील किरणे हे त्यांच्या तीव्र वेगामुळे अणूंचे आयनीभवन करण्यास सक्षम असतात. बीटा किरण, अल्फा किरण हे आयनीभवन न होणाऱ्या प्रारणांचे प्रकार आहेत. आयनीभवन न करणारी प्रारणे मनुष्याला हानीकारक असतात. दृष्य प्रकाश, अवरक्त तरंग, मायक्रोवेव्ह, रेडिओ लहरी व कमी तरंगलांबीची किरणे, क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील किरणे अशी सर्व आयनीभवन करणारी व न करणारी प्रारणे विद्युत चुंबकीय प्रारणेच असतात.

*    प्र.क्र. ८ – योग्य पर्याय क्र.(१)

दिलेल्या मूलद्रव्यांमध्ये सोने हा सर्वात कमी सक्रिय धातू आहे. तांबे, िझक, अ‍ॅल्युमिनियम यांची अभिक्रिया आम्लाबरोबर होते तसेच त्यांची सक्रियता त्यांच्या अणूतील बाह्य़ कक्षेमध्ये उपलब्ध इलेक्ट्रॉन्समुळे त्याच क्रमाने वाढते. पोटॅशियमची रासायनिक अभिक्रिया पाण्याबरोबरही होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Group pre examination