scorecardresearch

GATE Admit Card 2022: ‘या’ तारखेला मिळणार प्रवेशपत्र; ‘असं’ करता येईल डाउनलोड

गेट २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र आता ७ जानेवारीला उपलब्ध होणार आहे. गेटच्या अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षार्थी हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

GATE Admit Card 2022: ‘या’ तारखेला मिळणार प्रवेशपत्र; ‘असं’ करता येईल डाउनलोड
फेब्रुवारी महिन्याच्या ५, ६, १२ आणि १३ या तारखांना या परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून २ सत्रात या परीक्षा होतील. (फोटो: Indian Express)

तंत्रज्ञान आणि वास्तुकलेत एमटेक आणि एमएससीचे शिक्षण घेण्यासाठी आयोजित केली जाणारी ग्रॅज्युएट अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग म्हणजेच गेट २०२२ (Gate 2022) या परीक्षेसाठी मिळणारे प्रवेशपत्र आता ७ जानेवारीला मिळणार आहेत. आधी हे प्रवेशपत्र ३ तारखेला जाहीर होणार होते पण ही तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर https://gate.iitkgp.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, गेट २०२२ परीक्षेची तारीख आणि वेळ, पत्ता इत्यादी तपशील नमूद केलेले असतील.

फेब्रुवारी महिन्याच्या ५, ६, १२ आणि १३ या तारखांना या परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून २ सत्रात या परीक्षा होतील. पहिले सत्र सकाळी नऊ दुपारी १२ वाजेपर्यंत चालेल तर दुसरे सत्र दुपारी अडीच ते संध्याकाळी साडे पाचपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू आणि सात भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई (IIT मद्रास) आणि रुरकीद्वारे गेट परीक्षेचे संचालन केले जाते. यंदा गेट २०२२ परीक्षा आयआयटी खरगपूरद्वारे आयोजित केली जात आहे.

असं असेल परीक्षेचं वेळापत्रक

तारीखवेळविषय
४ फेब्रुवारी २०२२दुपारी २ ते ५मिसलेनियस एक्टिविटीज्
५ फेब्रुवारी २०२२सकाळी ९ ते दुपारी १२

दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०
सीएस आणि बीएम

ईई आणि एमए
६ फेब्रुवारी २०२२सकाळी ९ ते दुपारी १२

दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०
ईसी, ईएस, एसटी, एनएम, एमटी, एमएन

सीवाय, सीएच, पीआई, एक्सएच, आईएन, एजी, सीजी आणि टीएफ
११ फेब्रुवारी २०२२ दुपारी २ ते ५ मिसलेनियस एक्टिविटीज्
१२ फेब्रुवारी २०२२सकाळी ९ ते दुपारी १२

दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०
सीई-1, बीटी, पीएच, ईवाय

सीई-2, एक्सई एक्सएल
१३ फेब्रुवारी २०२२सकाळी ९ ते दुपारी १२

दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३०
एमइ-1, पीई, एआर

एमई-2, जीई, एई

गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक कसे डाउनलोड करायचे ?

७ जानेवारीपासून https://gate.iitkgp.ac.in/ या संकेतस्थळावर गेट २०२२ परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होईल. या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. गेट २०२२ च्या प्रवेशपत्राची हार्ड कॉपी उमेदवारांना पाठवली जाणार नाही याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. खालील पायऱ्यांचा वापर करून आपण आपले गेट २०२२ चे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

  1. गेटच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. गेट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी नावनोंदणी क्रमांक आणि पासवर्ड एंटर करा.
  3. गेट २०२२ लॉगिनवर क्लिक करा.
  4. गेट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  5. गेट प्रवेशपत्र २०२२ pdf स्वरूपात डाउनलोड होईल.
  6. गेट २०२२च्या परीक्षेला बसताना या प्रवेशपत्राची प्रिंटआऊट परीक्षार्थ्यांना आपल्यासोबत बाळगावी.

या वर्षीदेखील गेटच्या परीक्षेसाठी विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. गेट २०२२ मध्ये जिओमॅट्रिक्स इंजिनिअरिंग (जीई) आणि नेवल आर्किटेक्चर अँड मरीन इंजिनिअरिंग (एनएम) या नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर एकूण विषयांची संख्या २७ वरून २९ झाली आहे. याआधी २०२१ मध्ये देखील पर्यावरण विज्ञान आणि इंजिनिअरिंग तसेच मानविकी आणि सामाजिक विज्ञान हे दोन नवे विषय सहभागी करण्यात आले होते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या