IAF Group C Recruitment 2022: भारतीय हवाई दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. ही भरती ग्रुप सी सिविलियन पदांसाठी केली जात आहे आणि एअर ऑफिसर कमांडिंग एएफ बिदर आणि कमांडंट एअर फोर्स अकादमी हैदराबाद अंतर्गत होत आहे.

रोजगार वृत्तपत्रात (१८ डिसेंबर ते २४ डिसेंबर) हवाई दलाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अधिसूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.

( हे ही वाचा: Indian Navy Recruitment 2021: १२वी पाससाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी; पगार ४३ हजारांहून अधिक)

पात्रता काय?

रिक्त पदांची संख्या ५ आहे आणि त्यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

( हे ही वाचा: Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया)

निवड प्रक्रिया कशी असेल?

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. येथे लक्षात ठेवा की अधिसूचनेसह, अर्जाचा फॉर्म देखील उपलब्ध असेल. ते भरून पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागेल. लेखी परीक्षेची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

( हे ही वाचा: India Post Recruitment 2021: भारतीय पोस्टमध्ये १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; पगार ८१ हजारापर्यंत!)

या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना १८-२४ डिसेंबर रोजीच्या रोजगार बातम्या पाहण्याचा सल्ला दिला जातो. येथे तुम्हाला सूचना आणि अर्जाचा फॉर्म मिळेल.