नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दल ग्रुप सी सिव्हिलियनच्या विविध पदांकरिता उमेदवारांच्या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दलाचा भाग होण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या पसंतीच्या हवाई दल स्टेशनवर ऑफलाइन मोडद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये २१ ते २७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या तारखेपासून उमेदवार ३० दिवसांच्या आत २१ सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यातून अर्ज सादर करू शकतात.

दरम्यान अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त पात्रतेसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ १२ वी उत्तीर्ण/ मॅट्रिक्युलेशनसह विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार आयएएफ ग्रुप सी भर्ती २०२१ साठी https://indianairforce.nic.in/ या लिंक द्वारे अर्ज करू शकतात. तसेच indianairforce.nic.in या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकतात. नागरी श्रेणी अधीक्षक, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर, कुक, पेंटर आणि इतर पदांसाठी एकूण २८२ पदांची भरती करण्यात येत आहे. दरम्यान पात्रता, अनुभव, निवड निकष आणि इतर तपशीलांची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

रिक्त पदांचा तपशील

या भरती प्रक्रियेतून, हेड क्वार्टर मेंटेनन्स कमांडची १५३ पदे, मुख्यालय मेंटेनन्स कमांडची ३२ पदे, हेड क्वार्टर वेस्टर्न एअर कमांडची ११ पदे, स्वतंत्र युनिट्सची १ पदे, कुकसाठी ५ पदे (सामान्य श्रेणी), तसेच मेस स्टाफची ९ पदे , मल्टी टास्किंग स्टाफची १८ पदे, हाऊस कीपिंग स्टाफची १५ पदे, हिंदी टाइपिस्टकरिता ३ पदे, लोअर डिव्हिजन क्लर्क यांचासाठी १० पदे, स्टोअर कीपरची ३ पदे, सुतार कामाकरिता ३ पदे, पेंटरसाठी १ पोस्ट, अधीक्षक करिता ५ पोस्ट (स्टोअर ) आणि सिव्हिलियन मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरची ३ पदे अशी पदे यावेळी भारतीय हवाई दलामध्ये भरली जाणार आहेत.

कोणत्या पदासाठी किती शिक्षण आवश्यक?

अधीक्षक या पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

LDC या पदाकरिता तुम्हाला मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे महत्त्वाच आहे.

स्टोअर कीपर या पदासाठी तुम्ही बारावी किंवा समकक्ष पास असणे आवश्यक आहे.

कुक या पदाकरिता तुम्ही मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून १० वी पास बरोबर तुम्हाला कॅटरिंग किंवा या क्षेत्रात डिप्लोमा केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पेंटर, सुतार, कूपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, एसी मेक, फिटर, हाऊस कीपिंग स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, एमटीएस, टेलर, ट्रेड्समन या सर्व पदांकरिता तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १०वी पास असणे आवश्यक आहे.

हिंदी टायपिंग करिता तुम्ही १२ वी पास असणे आवश्यक आहे.

आयएएफ ग्रुप सी भर्ती २०२१ यात विविध पदांसाठी उमेदवारांचे वयोमर्यादा ही १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.