IBPS Clerk XII Recruitment 2022 : बँकेत सरकारी नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. बँकिंग कर्मचारी निवड संस्थेच्या (IBPS) माध्यमातून देशभरातील बँकांमध्ये लिपिकांच्या ६०३५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. बँकेत लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासह, अर्ज करण्यासाठी किमान वय २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे, अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना ८५० रुपये भरावे लागतील तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना फक्त १७५ रुपये भरावे लागतील.

आयबीपीएसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया. महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक या बँकांमध्ये भरती केली जाणार आहे.

CBSE 10th Results 2022 : ‘या’ दिवशी जाहीर होऊ शकतो दहावीचा निकाल; जाणून घ्या गुणपत्रिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया

आयबीपीएस लिपिक भरती २०२२ च्या महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची तारीख – १ जुलै २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२२
  • फी जमा करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२२
  • ऑगस्ट महिन्यात परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात येतील.
  • प्राथमिक परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात येतील.
  • मुख्य परीक्षा ऑक्टोबरमध्ये असेल.

निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा यांचा समावेश असेल. ज्यामध्ये प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील. पात्र उमेदवारांना ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.

आयबीपीएस लिपिक भरती प्रक्रिया २०२२ साठी अर्ज कसा करावा?

  • ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • आता होमपेजवर लिपिक भरतीच्या टॅबवर क्लिक करा.
  • अधिसूचना आणि अर्ज लिंक स्क्रीनवर दिसेल.
  • अधिसूचना डाउनलोड करा आणि अर्ज लिंकवर जा.
  • विनंती केलेली माहिती, कागदपत्रे आणि फोटो-सही अपलोड करा.
  • फी भरल्यानंतर सबमिट करा.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibps clerk xii recruitment 2022 recruitment vacancy details how to apply job opportunities in bank pvp
First published on: 06-07-2022 at 17:10 IST