इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने हिंदी अधिकाऱ्यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कालपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार या पदांसाठी १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत संस्थेच्या अधिकृत वेबसाइट ibps.in द्वारे अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक प्राध्यापक, फॅकल्टी रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट, हिंदी अधिकारी, आयटी इंजिनीअरसह विविध पदांची भरती केली जाणार आहे.

पात्रता काय?

फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स – पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान ५५ % गुणांसह खालीलपैकी कोणत्याही विषयात पीएचडी किंवा समकक्ष पदवी.

रिसर्च असोसिएट्स – मानसशास्त्र / शिक्षण / मानसशास्त्रीय मापन / सायकोमेट्रिक्स / मॅनेजमेंट (एचआर मध्ये स्पेशलायझेशन) मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्थांमधून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

हिंदी अधिकारी – ग्रॅज्युएशनमध्ये प्रमुख किंवा ऐच्छिक विषय म्हणून इंग्रजीसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

IT अभियंता (डेटा सेंटर) – संगणक विज्ञान किंवा IT मध्ये BE/B.Tech पदवी.

IBPS भरती २०२१: वयोमर्यादा

या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ४० वर्षे असावे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

IBPS भरती २०२१: निवड प्रक्रिया

सहयोगी प्राध्यापक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि परीक्षक या पदांसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. दुसरीकडे उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

IBPS भरती २०२१: या तारखा लक्षात ठेवा

अर्ज सुरू करण्याची तारीख – १ ऑक्टोबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२१

परीक्षेची संभाव्य तारीख – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१

अधिकृत वेबसाईट – ibps.in