IIT Bombay मध्ये नोकरीची संधी,अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर

अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

IIT Bombay Job Offer 2021
आयआयटी बॉम्बे जॉब ऑफर (file photo)

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अर्थात IIT Bombay Recruitment 2021 येथे भरती होणार आहे. भरती संदर्भात अधिसूचना IIT Bombay कडून जारी करण्यात आली आहे. भरती होत असलेल्या पदाचे नाव वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक असे आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

पात्रता तपशील:

पद: वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक

नोकरी संदर्भ क्रमांक: 50253346

प्रकल्पाचे शीर्षक: Sustainable Energy system for Achieving Novel Carbon neutral Energy communities (SUSTENANCE)

आवश्यक पात्रता आणि अनुभव: पीएचडीसह किमान ४ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव किंवा MTech/ ME/ MDes/ MBA किंवा समकक्ष पदवीसह किमान ८ वर्षांचा संबंधित अनुभव किंवा BTech/ BE/ MA/ MSc/ MCA किंवा किमान १० वर्षांचा संबंधित अनुभव असलेली समकक्ष पदवी आवश्यक आहे.

वेतन तपशील: लेव्हल PR-O3 साठी वेतन श्रेणी ५८८०० रुपये ते १०९२०० रुपये + १००००.०० रुपये आउट ऑफ कॅम्पस अलाऊन्स (लागू असल्यास)

जॉब प्रोफाइल: निवडलेला उमेदवार विविध प्रकल्प संबंधित उपक्रमांच्या समन्वय आणि व्यवस्थापनामध्ये सामील असेल ज्यात कार्यशाळा आयोजित करणे, (बैठका, अहवाल लेखन, खरेदी प्रक्रिया व्यवस्थापित करणे, प्रात्यक्षिक स्थळांचे रेकॉर्ड ठेवणे आणि इतर प्रकल्प व्यवस्थापन समाविष्ट आहे) संबंधित क्रियाकलाप असेल.

सामान्य माहिती

हे पद १ वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरत आहे आणि केवळ प्रकल्पाच्या कालावधीपुरतेच आहे.

नियुक्ती ही कालबद्ध (time bound )प्रकल्पासाठी आहे आणि उमेदवाराला प्रामुख्याने प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. निवड समिती उमेदवाराच्या मुलाखतीतील अनुभव आणि कामगिरीवर अवलंबून कमी किंवा जास्त पद आणि कमी किंवा जास्त पगार देऊ शकते.

मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक असेल.

पत्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, पवई, मुंबई ४०००७६

निवड प्रक्रिया: निवड लेखी परीक्षा/मुलाखतीवर आधारित असेल

अर्ज करण्याची  शेवटची तारीख: १३ सप्टेंबर २०२१

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Iit bombay recruitment 2021 vacancy for project manager apply online for posts sarkari nokriya ttg