scorecardresearch

India Post Office recruitment 2022: नवीन सूचना जारी; पगार ६३ हजारांहून अधिक

लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. एकूण २९ पदे भरण्यात येणार आहेत.

India Post Office recruitment 2022: नवीन सूचना जारी; पगार ६३ हजारांहून अधिक
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

पोस्ट विभाग कर्मचारी कार चालक पदांसाठी भरती होत आहे. यासाठी अर्ज मागवले जात आहेत. यासाठी सातव्या केंद्रीय वेतन आयोग (CPC) स्केलनुसार वेतन मिळणार आहे. उर्वरित पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा थेट भरतीने भरल्या जाणार आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण २९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ पदे सर्वसाधारण, ८ ओबीसी, ३ अनुसूचित जाती आणि ३ पदे ईडब्ल्यूएससाठी आहेत.

महत्वाचे तपशील

अर्ज करण्याची शेवटची तारीख: मार्च १५, २०२२ (सायंकाळी ५)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- २९

सामान्य (General) – १५

ओबीसी (OBC) – ८

अनुसूचित जाती (SC) – ३

EWS – ३

(हे ही वाचा: SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशील)

पगार किती?

निवडलेल्या उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये पगार मिळेल (७ व्या CPC नुसार वेतन मॅट्रिक्समध्ये स्तर-2)

पात्रता निकष

उमेदवाराकडे हलक्या आणि जड वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावा)

हलके आणि जड वाहन चालविण्याचा अनुभव किमान तीन वर्षे

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा.

पात्रता: होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून तीन वर्षांची सेवा.

प्रोबेशन कालावधी: दोन वर्षे

(हे ही वाचा: Gate Exam 2022 पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा)

वयोमर्यादा

अर्जदारांचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. SC आणि ST साठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे सूट.

वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महत्त्वाची तारीख ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख, १५ मार्च २०२२ असेल.

निवड प्रक्रिया

मोटार यंत्रणेचे ज्ञान आणि वाहनातील किरकोळ दोष दूर करण्याची क्षमता यासह हलकी आणि जड मोटार वाहने चालविण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी विभागाद्वारे विहित केलेल्या चाचणीच्या आधारे निवड केली जाईल.

पात्र उमेदवारांना चाचणीची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे सूचित केले जाईल. पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या संदर्भात कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!)

अर्ज कसा करायचा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यानुसार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जांची माहिती/ संलग्नक योग्य आकाराच्या जाड कागदाच्या लिफाफ्यात पाठवावेत ज्याच्या मुखपृष्ठावर स्पष्टपणे “कर्मचारी पदासाठी अर्ज” असे लिहिलेले असेल. MMS दिल्ली येथे कार चालक (थेट भरती) फक्त स्पीड पोस्ट/रजिस्टर पोस्टद्वारे ‘वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, C-121, नारायणा इंडस्ट्रियल एरिया फेज-I, नरैना, नवी दिल्ली-110028’ इथे पाठवावे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2022 at 10:13 IST

संबंधित बातम्या