भारतीय डाक विभागात दिल्ली सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंट, पोस्टमन आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांची भरती सुरू झालीय. या पदांसाठी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड ही मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होईल. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर असून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

भारतीय डाक विभागाच्या दिल्ली सर्कलमध्ये तब्बल २२१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात पोस्टल असिस्टंटचे ७२, पोस्टमनसाठी ९० आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी ५९ पदांचा समावेश आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट आणि पोस्टमन या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १२ वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवाराने १० वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. याशिवाय उमेदवाराचं वय १८ वर्षे ते २७ वर्षे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवाराचं वय १८ वर्षे ते २५ वर्षे दरम्यान असावं. दिल्ली सर्कलसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली अधिसूचना पाहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
Ramtek Lok Sabha Constituency candidate Karthik Gendlal Doke has property worth only Rs 500
आश्चर्य! ‘या’ उमेदवाराकडे केवळ ५०० रुपयांची मालमत्ता, देशातील दुसरा सर्वात गरीब…
Andhasraddha Nirmulan Samiti
अर्ज भरण्यासाठी मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी – अंनिसचा आक्षेप
Election Commission ,Lok Sabha election
लोकजागर: अमर्याद खर्चाची ‘मर्यादा’!

पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट पदांवरील निवडक उमेदवारांना दरमहा २५,००० ते ८१,००० रुपये वेतन दिले जाईल. तर, पोस्टमन पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये प्रति महिना आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी १८००० ते ५६,९०० रुपये दरमहा वेतन मिळेल. सर्व इच्छुक उमेदवारांनी १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्कही भरावे लागेल.