इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूर येथे निवासी स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या एलएलएम या २ वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमातील विषय
अभ्यासक्रमातील समाविष्ट विषयांमध्ये प्रामुख्याने इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, कॉर्पोरेट लॉ, इंटरनॅशनल लॉ, कॉन्स्टिटय़ुशनल लॉ, कॉम्पिटिशन लॉ, क्रिमिनल लॉ व टॅक्सेशन लॉ इत्यादी विषयांचा समावेश आहे.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी तीन अथवा पाच वर्षे कालावधीचा कायदा विषयातील पदवी अभ्यासक्रम किमान ६० टक्के गुणांसह पूर्ण केलेला असावा. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २३ मे २०१५ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे  समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल आणि त्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी आयटीआय-खडगपूरच्या http://www.iitkgp.ac.in/topfiles/law.php अथवा http://www.rgsolpl.iitkgp.ernet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेशअर्ज, राजीव गांधी स्कूल ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूर या पत्त्यावर ११ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.   

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
BBA
बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?