अभिनय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम आणि संधींचा आढावा
गेल्या काही वर्षांमध्ये अभिनय क्षेत्रातील रीतसर अभ्यासक्रम उपलब्ध होऊ लागले आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये यासंबंधित पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. केवळ एखाद्दुसऱ्या स्पर्धेत पारितोषिक मिळाल्याने आपण जातिवंत कलाकार असल्याच्या भ्रमात न राहता या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी अभिनय व त्याच्याशी निगडित घटकांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते.
असे अभ्यासक्रम कला, नाटय़कला आणि अन्य संबंधित खात्यांतर्फे तसेच प्रमुख प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांत सुरू आहेत.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद- ४३१००४
अभ्यासक्रम – सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स इन ड्रॅमॅटिक्स.
शैक्षणिक अर्हता – किमान पदवीधर
* म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर – ५७०००५
अभ्यासक्रम – डिप्लोमा इन फिल्म अॅक्टिंग.
* राजस्थान विद्यापीठ, गांधीनगर, जयपूर-३०२००४.
अभ्यासक्रम – बॅचलर इन फाइन आर्ट्स इन ड्रॅमॅटिक्स.
* संबलपूर विद्यापीठ, ज्योती विहार, बुर्ला, संबलपूर- ७६८०१९
कोर्स इन ड्रामा (बीए)
* फॅकल्टी ऑफ परफॉर्मिग आर्ट्स, एम. एस. विद्यापीठ (बडोदा), वडोदरा- ३९०००२.
अभ्यासक्रम – बॅचलर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स इन ड्रॅमॅटिक्स.
मास्टर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स इन ड्रॅमॅटिक्स
bपाँडिचेरी विद्यापीठ, काळापेत, पाँडिचेरी-६०५०१४
कोर्स- बॅचलर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स
* नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,
बहावळपूर हाऊस, भगवानदास रोड, नवी दिल्ली-११०००१
अभ्यासक्रम – डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक आर्ट्स
कालावधी- तीन वर्षे.
पात्रता : देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर. किमान १० प्रयोगांमध्ये सहभाग. हिंदी आणि इंग्रजी भाषांचे कामचलाऊ ज्ञान. वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांच्या मधील (एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांनी शिथिल).
या ठिकाणी देण्यात येणारे प्रशिक्षण खडतर असते. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा शारीरिक फिटनेस लक्षात घेतला जातो. एनएसडी डॉक्टरचे तसेच विमातज्ज्ञांचेउमेदवारांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर करावे लागते.
निवड : उमेदवारांची प्राथमिक चाचणी सामान्यत: मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि दिल्लीमध्ये आयोजित केली जाते. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी एनएसडीच्या वास्तूमध्ये तीन ते पाच दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी होता येते.
उमेदवारांना सादरीकरणातील कौशल्याची प्राथमिक, सुसंगत माहिती दिली जाते. आवाज, वक्तृत्व आणि संगीताच्या शिक्षणातून श्वासोच्छ्वास, आवाजातील चढ-उतार इ.वर लक्ष केंद्रित केले जाते. आयत्यावेळी एखाद्या सादरीकरणातील काम कसे करावे याखेरीज अभिनयाच्या विद्यार्थ्यांना दिग्दर्शनातील काही अंतर्गत बाबींची माहिती दिली जाते. मंच कारागिरी, नाटकाचा अभ्यास, नाटय़तंत्रे, रंगभूमीचा इतिहास यांसारख्या आणि सौंदर्यशास्त्र, चित्रपट/रंगभूमी रसग्रहण, रंगमंच व्यवस्थापन अशासारख्या गोष्टी अभिनय कलेच्या अभ्यासात समाविष्ट असतात.
या क्षेत्रात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने यासंबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश प्राप्त करणे हे तसे कठीण काम आहे. भूमिका निभावण्यासाठी खरे तर कलाकाराला किमान शैक्षणिक पात्रता लागत नाही. मात्र, व्यवसायाची आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यापीठाची पदवी अभिनेत्यापाशी असणे ही एक पूरक ठरते. विविध प्रकारच्या भूमिका सादर करण्यासाठी विद्यापीठाची पाश्र्वभूमी लाभलेला कलाकार अधिक अभ्यासू वृत्तीने काम करू शकतो असे मानले जाते. काही मोजके अपवाद वगळल्यास अभिनय शिकवणाऱ्या शाळांमध्ये आणि प्रमुख संस्थांमध्ये पदवीधरांनाच प्रवेश दिला जातो. नाटय़कलेचे उच्च शिक्षण देण्यासाठी नाटय़कलेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक असते.
कोणतीही भूमिका मिळण्यासाठी उमेदवारीच्या काळात प्रत्येकालाच ऑडिशन ही द्यावीच लागते. काम प्राप्त करण्यासाठी उत्तम संपर्क असणे ही आज महत्त्वाची बाब मानली जाते.
करिअर संधी
उदयोन्मुख अभिनेते साधारणपणे नाटकातील सहभाग/ दूरदर्शन मालिका/ हलकीफुलकी नाटुकली, एकांकिका/चित्रपट इ. माध्यमांमध्ये छोटय़ा भूमिका निभावत आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात करू शकतात. क्षमता, मेहनत आणि उत्तम नेटवर्किंगच्या जोरावर एखादा कलाकार मोठय़ा साहाय्यक भूमिकेत किंवा रंगमंच, दूरचित्रवाणी वाहिन्या अथवा चित्रपटात चमकू शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
अभिनयाचे प्रशिक्षण आणि संधींचे आकाश
गेल्या काही वर्षांमध्ये अभिनय क्षेत्रातील रीतसर अभ्यासक्रम उपलब्ध होऊ लागले आहेत.
First published on: 28-01-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information of acting courses and various scope