करिअरन्यास

मी शिक्षक असून पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागात एम.ए. इंग्रजीचे शिक्षण घेत आहे.

मी शिक्षक असून पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागात एम.ए. इंग्रजीचे शिक्षण घेत आहे. प्राध्यापक पदासाठी ‘एक्स्टर्नल’पेक्षा ‘रेग्युलर’ विद्यार्थ्यांना झुकते माप मिळते का? प्राध्यापक पदासाठी स्वत:ची उमेदवारी मला कशी निश्चित करता येईल?
– मिलिंद पाटील
कोणत्याही अधिकृत विद्यापीठातून अथवा शिक्षण संस्थेतून पूर्ण केलेला अभ्यासक्रम प्राध्यापकपदासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे आपण एक्स्टर्नल आणि रेग्युलरचा गोंधळ मनातून काढून टाकावा. केवळ एम.ए केल्याने प्राध्यापकी मिळू शकत नाही. नेट/ सेट/ पीएच.डी. या अर्हताही तुम्हाला प्राप्त कराव्या लागतील. त्याशिवाय मुलाखतीला सामोरे जावे लागेल. आपल्या वयाचाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊनच तयारी करावी.

माझ्या बहिणीचे जुल २०१५ मध्ये बीई इलेक्ट्रिकल झाले आहे. एमई व एमटेक करण्याचा तिचा मानस नाही. ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन, पॉवर ऑडिट आणि एनर्जी ऑडिट या विषयातील नोकरीच्या संधींची माहिती हवी होती.
 – संकेत कुलकर्णी, अकलूज
बीई इलेक्ट्रिकल झालेल्या व्यक्तीला पुढील क्षेत्रांत नोकरीच्या संधी मिळू शकतात- राज्य सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या विविध कंपन्या, नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन, पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, खासगी कंपन्यांमार्फत सुरू करण्यात आलेल्या वीज निर्मिती कंपन्या.
इंडियन इंजिनीअिरग सíव्हस ही परीक्षा  उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्यास देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळू शकते. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन या विषयांमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवर या संस्थेने २६ आठवडे कालावधीचा पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. नवे सत्र २१ सप्टेंबर २०१५ पासून सुरू होत आहे. संपर्क- http://www.cbip.org. एनर्जी ऑडिट वा पॉवर ऑडिटमध्ये करिअर करायचे असल्यास या विषयातील प्रशिक्षण घेतलेले उत्तम. असे प्रशिक्षण कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल वेल्फेअर अ‍ॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केले आहे. या संस्थेचा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम मास्टर्स प्रोग्रॅम इन एनर्जी मॅनेजमेंट या नावाने ओळखला जातो. याशिवाय संस्थेने काही लघु मुदतीचे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. संपर्क- – http://www.iiswbm.edu

आपल्या देशात  अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी या विषयाचे अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहेत आणि त्यातील करिअर
संधी कोणत्या?
    – संपदा कुलकर्णी, ठाणे
विज्ञान शाखेतून बारावी केल्यानंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळुरू अथवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करावा. या संस्थांमध्ये संशोधन अभ्यासास प्राधान्य दिले जाते, अथवा मुंबई विद्यापीठातून बीएएस्सी / एमएस्सी अभ्यासक्रम करता येतील. अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी हा विषय स्पेशलाइज्ड असून तो इंडियन अ‍ॅस्ट्रोबॉयलॉजी रिसर्च सेंटरमार्फत सुरू करण्यात आला आहे. तो डिप्लोमा इन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी या नावाने ओळखला जातो.
संपर्क-  http://www.iarc.res.in

मी २०११ साली एम.एस्सी केमिकल्स उत्तीर्ण झाले. केमिकल कंपनीत काम करत आहे. पण पगारवाढ कमी आणि त्रास जास्त आहे. पॅकेजिंग क्षेत्रात गेले तर पगारवाढ जास्त असेल का? त्यासाठी कोणते अभ्यासक्रम करावे लागतील?
    – स्वाती पुजारे
आपल्याला आपल्या कंपनीची आíथक स्थिती काय आहे, हे जाणून घ्यावी लागेल. शिवाय आपल्यालाच पगारवाढ देण्यात आली नाही की इतर कर्मचाऱ्यांची तशीच स्थिती आहे, ही बाबही लक्षात घ्यावी. खासगी कंपन्यांमध्ये गुणवत्तेवर व कार्यशैलीवर पगारवाढ आणि पदोन्नती केली जाते. आपण त्यात कुठे कमी पडता का, याचे आत्मपरीक्षण करावे. ते वस्तुनिष्ठ असावे. एखाद्या कंपनीत त्रास होतो म्हणजे काय, याची व्याख्या खूप विस्तारली जाऊ शकते. अंगावर येणारे अधिकचे काम, उशिरापर्यंत थांबावे लागणे, पाहिजे त्या वेळेस रजा न मिळणे आदी बाबी या काहीजणांना त्रासाच्या वाटू शकतात. प्रत्यक्षात अधिक प्रगतीसाठी आपल्याला कामाला अधिक वेळ देण्याची व्यवस्थापनाची अपेक्षा असू शकते. पॅकेजिंग क्षेत्रातही आपल्याला वाटतो तसा त्रास होणारच नाही, याची खात्री देणे शक्य नाही. कोणत्याही कंपनीमध्ये तुमची गुणवत्ता, परिश्रम करण्याची तयारी आणि पुढाकार घेऊन काम करण्याची समíपत वृत्ती यावर प्रगती, वेतनवाढ, भत्त्यात वाढ, प्रोत्साहने अवलंबून असतात. पॅकेजिंग उद्योगात काम करण्याआधी या विषयातील अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरू शकते. संस्था- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग. अभ्यासक्रम- पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग (कालावधी- दोन वष्रे)/ सर्टििफकेट प्रोग्रॅम इन पॅकेजिंग (कालावधी- तीन माहिने)/ डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रॅम (दूरस्थ शिक्षण) (कालावधी- दीड वष्रे)
संपर्क-  http://www.iip-in.com

मी बारावीमध्ये आहे. जर मला विधी शाखेत जायचे असल्यास कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागेल? थेट प्रवेश मिळू शकतो का?
    – देवांशी बुरांडे
विधीशाखेत प्रवेशासाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट ही देशस्तरीय परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे केंद्रीय विधी संस्था/ विधी विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. काही खासगी संस्था या परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरतात. जिंदाल लॉ स्कूलसारख्या संस्था त्यांची स्वतंत्र परीक्षा घेतात. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात बारावीतील गुणांवर थेट प्रवेश मिळू शकतो.

मी बारावीमध्ये आहे. मला SAT परीक्षा द्यायची आहे. या परीक्षेची तयारी कशी करू?
    – शिवम पाटील
SAT परीक्षा (स्तर १ आणि २) अमेरिकेतील काही शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयाधील  पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेत इंग्रजी आणि अंकगणितासंबंधित विविध प्रकारचे प्रश्न (व्हर्बल आणि क्वॉन्टिटेटिव्ह रिझिनग) विचारले जातात. या परीक्षेचा कालावधी- तीन तास. ही परीक्षा अमेरिकेतील कॉलेज बेस्ड एक्झामिनेशन बोर्डमार्फत घेतली जाते. आपल्या देशभरातील परीक्षा केंद्रांमध्ये पुणे, बेंगळुरू, नवी दिल्ली, कोचीन, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आदी शहरांचा समावेश आहे.

मी बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षांत आहे. माझे भाषेवरील कौशल्य उत्तम आहे. मी लवकरात लवकर कमाई करू इच्छितो. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ?
– स्मितेश चौबळ
शब्द संपत्ती, भाषा चांगली असल्याची  खात्री असल्यास आपण लेखन, पत्रकारिता, जाहिरात या क्षेत्रांत प्रवेश करायला हरकत नाही. तुम्हाला मास मीडिया, जाहिरात या विषयाशी निगडित अभ्यासक्रम करता येतील.

मला म्युच्युअल फंड अभ्यासक्रमाबाबत माहिती द्यावी.
    – दिगंबर डोके
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमार्फत ‘एनएसई सर्टििफकेट मार्केट प्रोफेशनल’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात इतर विषयांसोबत म्युच्युअल फंड हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. संपर्क- http://www.nse-india.com. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या एज्युकेशन विभागामार्फतही म्युच्युअल फंडाविषयी अल्पावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याशिवाय ग्लोबल फायनान्शिअल मार्केट प्रोफेशनल प्रोग्रॅम या अभ्यासक्रमात म्युच्युअल फंडाबाबत प्रशिक्षण दिले जाते.
संपर्क- http://www.bsebti.com

 मी बी.कॉम पूर्ण केले आहे. मला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत एमएसडब्ल्यू करावेसे वाटते. याचा मला लाभ होईल का? एमएसडब्ल्यू केल्यानंतर करिअरच्या संधी कोणत्या?     – पंकज हसे
तुम्ही इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाद्वारे एमएसडब्ल्यू करू शकता. या विषयाचे ज्ञान आपण किती ग्रहण केले आणि त्याचा प्रत्यक्ष वापर कितपत करता येईल यावरच करिअर संधी उपलब्ध राहतील. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासकीय अथवा खासगी संस्थांमध्ये संधी मिळू शकते. सामाजिक आणि आíथकदृष्टय़ा मागास आणि विपन्नावस्थेत असलेल्या घटकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेमध्येही काम मिळू शकते. क्राय, सिनी, हेल्पेज इंडिया, युनिसेफ, युनेस्को या संस्थांना अशा मनुष्यबळाची गरज भासते. ग्रामविकास मंत्रालयातर्फे करार पद्धतीने या अर्हतेच्या उमेदवारांना नोकरी देत असते. विविध उपचार केंद्रे, आपत्ती व्यवस्थापन संस्था, समुपदेशन केंद्रे, रुग्णालये, आरोग्य क्षेत्र, मानवाधिकार संस्था, मनोरुग्णालये, तुरुंग, वृद्धाश्रम या ठिकाणी अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. मात्र त्यासाठी विषयाचे सखोल ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर लगेचच संधी मिळतील असे नाही. त्यासाठी आपल्याला वृत्तपत्रे, समाज माध्यमे, इंटरनेट आदींद्वारे तसेच स्वत:च्या नेटवìकगद्वारे संधींचा शोध घ्यावा लागेल. समाजसेवा या क्षेत्रात संयम राखण्याची गरज असते, त्याशिवाय त्यात लगेच पदोन्नती किंवा अधिक धनलाभ वगरेची अपेक्षा ठेवू नये.
अभ्यासक्रम, करिअर संधी विषयक आपले प्रश्न
career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवावेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information of courses and career opportunities