इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दलाने दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती जाहीर केली आहे. त्याअंतर्गत हवालदाराची विविध पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आयटीबीपी भरती २०२२ साठी नोंदणी प्रक्रिया १९ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल आणि उमेदवार १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करू शकतील. या भरती मोहिमेद्वारे संस्थेत १०८ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्षे दरम्यान असावे.

भरती प्रक्रियेचे तपशील :

  • कॉन्स्टेबल (कार्पेंटर): ५६ पदे
  • कॉन्स्टेबल (मेसन): ३१ पदे
  • कॉन्स्टेबल (प्लंबर): २१ पदे

IBPS PO 2022 Exam: बँक पीओच्या ६०००हून अधिक पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या अर्ज करायची शेवटची तारीख

कोण अर्ज करू शकतो?

कॉन्स्टेबलच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मॅट्रिकची पदवी किंवा मान्यताप्राप्त बोर्डाची समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांनी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मेसन, कारपेंटर आणि प्लंबरचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला असावा.

निवड कशी केली जाणार?

उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी, व्यापार चाचणी आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. पात्र उमेदवार आयटीबीपी recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.