नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE) मेन्सचा B.Arch आणि B.Planning परीक्षेचा पेपर २ चा निकाल २०२१ (सत्र ४) मंगळवारी (५ ऑक्टोबर) जाहीर झाला आहे. जे उमेदवार परीक्षेला बसले आहेत ते jeemain.nta.nic.in वरून निकाल बघू शकतात. जेईई मेन पेपर २ परीक्षा २०२१ मध्ये २२,००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

जेईई मेन्स पेपर २ सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की प्रोव्हेजनल अॅन्सर की (provisional answer key) प्रकाशित झाल्यानंतर निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत प्रोव्हेजनल अॅन्सर कीच्या विरोधात हरकती मांडण्याचा पर्याय देण्यात आला होता.

असा करा निकाल डाउनलोड

अधिकृत वेबसाईट- jemain.nta.nic.in वर जा.

“JEE Main 2021 Result Paper 2” या अधिसूचनेवर क्लिक करा.

एक नवीन विंडो उघडेल.

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी त्यांची ओळखपत्रे प्रविष्ट करावी लागतील.

भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी निकालाची प्रत ठेवावी.