|| सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com
आयडीबीआय बँक (IDBI) च्या विविध शाखा आणि ऑफिसेसमध्ये ‘एक्झिक्युटिव्ह’ (Executive) च्या एकूण ९२० पदांची करार पद्धतीने भरती.

(Advt. No. ४/२०२१-२२) (अजा – १३८, अज – ६९, इमाव – २४८, ईडब्ल्यूएस – ९२, खुला – ३७३) यातील प्रत्येकी ९ जागा दिव्यांग VI/OH/HI/MD, ID कॅटेगरीसाठी राखीव.

पात्रता – (दि. १ जुलै २०२१ रोजी) पदवी किमान सरासरी (सर्व सेमिस्टर्स) ५५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ५०%गुण)

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२१ रोजी २० ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

एकत्रित वेतन – दरमहा रु. २९,०००/- पहिल्या वर्षी, रु. ३१,०००/- दुसऱ्या वर्षी, रु. ३४,०००/- तिसऱ्या वर्षी. निवडलेल्या उमेदवारांना करारानंतरच्या काळात IDBI  बँकेत कायम केल्यास त्यांचा कराराचा कालावधी सेवाकाळ म्हणून समजला जाणार नाही.

अर्जाचे शुल्क/इंटिमेशन चार्जेस –

रु. १,०००/- (अजा/अज/दिव्यांग रु. २००/-).

निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचे ठरले आहे. ज्यात पुढील टेस्ट्सचा समावेश असेल. रिर्झंनग, र्वंिकग इंग्लिश नॉलेज, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड – प्रत्येकी ५० प्रश्न/५० गुण, एकूण १५० प्रश्न/१५० गुण/वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

ऑनलाइन टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि प्री-रिक्रूटमेंट मेडिकल टेस्टसाठी बोलाविण्यात येईल.

ऑनलाइन टेस्टमधील गुणवत्तेनुसार इतर बाबींची पूर्तता के ल्यास उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नागपूर, पुणे इ.

ऑनलाइन कॉल लेटर्स IDBI बँकेच्या संकेतस्थळावरून दि. २७ ऑगस्ट २०२१ पासून डाऊनलोड करता येतील.

प्री-एक्झामिनेशन ट्र्रेंनग ((PET) – COVID -१९ Pandemic  रू मुळे कदाचित घेतली जाणार नार्ही PET Virtual Mode ने घेतले जाईल. अर्ज करताना उमेदवारांनी ढएळ साठी नोंद करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज http://www.idbibank.in या संकेतस्थळावर दि. १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत.  (CAREERS/CURRENT OPENINGS > Recruit of Executive on Contract-2021 > Apply Online > Click here for New Registration)

ऑनलाइन अर्जासोबत छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाती लिहिलेले घोषणापत्र स्कॅ न करून अपलोड करणे आवश्यक असेल.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), (संरक्षण मंत्रालयांतर्गत नवरत्न कंपनी) अन्र्ड व्हॅल्यू मॅनेजमेंट (EVM) प्रोडक्शनकरता बेंगळूरु कॉम्प्लेक्समधील स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्स (SBUs) मध्ये पुढील ५११ पदांची करार पद्धतीने भरती.

(१) ट्रेनी इंजिनीअर-१ – एकूण ३०८ पदे. (अजा – ४७, अज – २३, इमाव – ८३, ईडब्ल्यूएस – ३१, खुला – १२४) यातील ४%पदे दिव्यांग उमेदवार राखीव.

(२) प्रोजेक्ट इंजिनीअर-१ – २०३ पदे (अजा – ३०, अज – १४, इमाव – ५४, ईडब्ल्यूएस – २१, खुला – ८४).

दोन्ही पदांसाठी पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स विषयांतील इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्गासह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग यांना गुणांची अट नाही.)

दोन्ही पदांसाठी प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी अनुभव – इंडस्ट्रीमधील संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी पद क्र. १ साठी २५ वर्षे, पद क्र. २ साठी २८ वर्षे (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

अर्जाचे शुल्क – ट्रेनी इंजिनीअर पदांसाठी रु. २००/-. प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी

रु. ५००/-. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.)

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्ता आणि अनुभव यांच्या आधारे उमेदवार  मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. ई-मेलद्वारे शॉर्टलिस्टेड उमेदवारांना कळविण्यात येईल.

पात्रता परीक्षेतील गुणवत्तेसाठी ७५ गुण, अनुभवासाठी जास्तीत जास्त १० गुण (आवश्यक असलेल्या किमान अनुभवासाठी २.५ गुण आणि अधिकच्या प्रत्येक ६ महिन्यांसाठी १.२५ गुण), मुलाखतीसाठी १५ गुण आणि एकूण १०० गुण

अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस/दिव्यांग उमेदवारांनी अलीकडच्या काळात काढलेले दाखले (www.bel-india.in या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यातील) सादर करणे आवश्यक आहे.

ट्रेनी इंजिनीअर पदांवर सुरुवातीला उमेदवारांची १ वर्षाच्या मुदतीवर भरती केली जाईल. जी मुदत आणखीन दोन वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते. दरमहा एकत्रित मानधन पहिल्या वर्षी रु. २५,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. २८,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ३१,०००/-.

प्रोजेक्ट इंजिनीअर पदांवर सुरुवातीला २ वर्षांसाठी करार पद्धतीने निवड केली जाईल. करार आणखीन २ वर्षांनी वाढविला जाभ शकतो. दरमहा एकत्रित मानधन पहिल्या वर्षी रु. ३५,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ४०,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ४५,०००/-, चौथ्या वर्षी

रु. ५०,०००/-.

शंकासमाधानासाठी   hrcompsem@bel.co.in  या ई-मेलवर संपर्क साधा.

ऑनलाइन अर्ज www.bel-india.in   या संकेतस्थळावर आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत.