सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट (IARI), पुसा, नवी दिल्ली – ११० ०१२ ‘असिस्टंट’च्या एकूण ४६२ पदांची भरती.

(१)  ICAR मुख्यालयातील असिस्टंट’ – ७१ पदे (अजा – ७, अज – १, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ४४) (३ पदे दिव्यांग कॅटेगरी  LD/ CP/ B/ LV/ HH/ MD साठी राखीव). वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ७७,०००/-.

(२)  ICAR रिसर्च इन्स्टिटय़ूट्स असिस्टंट’ – ३९१ पदे (अजा – ४१, अज – १३, इमाव – ७९, ईडब्ल्यूएस – २३, खुला – २३५ (५ पदे दिव्यांग कॅटेगरी   LD/ CP/ B/ LV/ HH/MD साठी राखीव).

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६१,०००/-

पात्रता : पदवी उत्तीर्ण. (उमेदवारांनी पदवीच्या गुणांची टक्केवारी (२ डेसिमलपर्यंत) अर्जात नमूद करणे आवश्यक.  CGPA/ DGPA पद्धतीने श्रेणी दर्शविली असल्यास उमेदवारांनी श्रेणीचे गुणांत रूपांतर करण्याचा पुरावा युनिव्हर्सिटीकडून सादर करणे आवश्यक.)

वयोमर्यादा : दि. १ जून २०२२ रोजी २० ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – परीक्षा शुल्क – रु. ७००/-   रजिस्ट्रेशन शुल्क रु. ५००/-, एकूण रु. १,२००/-; महिला, अजा, अज, दिव्यांग – फक्त रजिस्ट्रेशन फी रु. ५००/- भरावी लागेल.

निवड पद्धती :

(ए)  ICAR असिस्टंट ग्रेड पूर्व परीक्षा  MCQ type  प्रश्न (१) जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग, (२) जनरल अवेअरनेस, (३) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, (४) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. प्रत्येकी २५ प्रश्न/५० गुण, वेळ १ तास.

(बी)  ICAR असिस्टंट ग्रेड मुख्य परीक्षा : पेपर-१ (ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न) (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटीज – ५० प्रश्न, १०० गुण आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – १०० प्रश्न, १०० गुण, वेळ २ तास).

पेपर-२ : डिस्क्रीप्टिव्ह टाइप पेपर इंग्लिश किंवा हिंदी (निबंध लेखन, सारांश लेखन, लेटर/अ‍ॅप्लिकेशन इ. १०० गुण, वेळ १ तास. पेपर-२ ऑफ लाइन मोडने होईल.)

पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेतील पेपर-१ मध्ये चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

पूर्वपरीक्षेतून १:१० प्रमाणात उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील.

(सी) स्किल टेस्ट : कॉम्प्युटर प्रोफिशियअन्सी टेस्ट ( CPT) ( Word Procession,  Spread Sheet,  Generation of Slides) प्रत्येक मॉडय़ूलसाठी वेळ १५ मिनिटे  उढळ फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमधील Annexure- III मध्ये दिलेला आहे.

परीक्षा केंद्र : (महाराष्ट्रातील – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे).

ऑनलाइन अर्ज  https://www.iari.res.in या संकेतस्थळावर दि. १ जून २०२२ पर्यंत करावेत.

ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा अंदाजे जून २०२२ च्या शेवटच्या आठवडय़ात होईल. मुख्य परीक्षा आणि स्किल टेस्टच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

एकूण ३९१ असिस्टंट पदांपैकी महाराष्ट्रातील  ICAR रिसर्च इन्स्टिटय़ूट्समधील रिक्त पदे –

(१)  ICAR, नागपूर – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

(२) CICR, नागपूर – १ पद (खुला).

(३) DFR, पुणे – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५).

(४)  DOGR, पुणे – ३ पदे (खुला).

(५)  NRC ग्रेप्स, पुणे – १ पद (खुला).

(६)  NRC डाळिंब, सोलापूर – ६ पदे (खुला).

(७)  CCARI गोवा – १ पद (खुला).

(८)  NBSS & LUP, नागपूर – ६ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

(९)  NIASM,, बारामती – ९ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, खुला – ४).

(१०)  CIFE, मुंबई – ७ पदे (अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

(११)  ATARI Zone III,, पुणे – २ पदे (खुला).

१२८१ ग्रुप-बी आणि ग्रुप-सी पदांच्या भरतीसाठी (Assam Rifles) आसाम रायफल्स, शिलाँग – टेक्निकल आणि ट्रेड्समन रिक्रूटमेंट रॅली-२०२२ दि. १ सप्टेंबर २०२२ पासून घेणार आहे. या भरतीसाठी राज्यनिहाय रिक्त पदे निश्चित केलेली आहेत. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी एकूण ७१ पदे भरण्याचे नियोजित केले आहे.

ग्रुप-सी पदे –

(१) रायफलमॅन (नर्सिग असिस्टंट) – (फक्त पुरुष) ६ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(२) रायफलमॅन (लॅबोरेटरी असिस्टंट) – (फक्त पुरुष) १ पद (खुला).

पात्रता पद क्र. १ व २ साठी – १० वी (इंग्लिश, गणित, विज्ञान आणि बायोलॉजी विषयांसह) उत्तीर्ण.

(३) रायफलमॅन (वॉशरमॅन) – (फक्त पुरुष) ३ पदे (भज – १, इमाव – १, खुला – १).

(४) रायफलमॅन (Armourer) – (फक्त पुरुष) ३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १).

(५) रायफलमॅन (आया) (पॅरामेडिकल) – (फक्त महिला) १ पद (खुला).

पात्रता : पद क्र. ३ ते ५ साठी १० वी उत्तीर्ण.

(६) हवालदार (ऑपरेटर रेडिओ अँड लाईन) – (फक्त पुरुष) ४४ पदे (अजा – ५, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १९).

पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि रेडिओ अँड टेलीव्हिजन किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील २ वर्ष कालावधीचा आय्टीआय् कोर्स

किंवा १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह) उत्तीर्ण.

(७) हवालदार क्लर्क – (पुरुष व महिला) ९ पदे (अज – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

पात्रता : १२ वी उत्तीर्ण (स्किल टेस्टचे निकष – कॉम्प्युटरवर इंग्लिश टायिपग स्पीड ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायिपग स्पीड ३० श.प्र.मि. (वेळ १० मिनिटे)).

(८) वॉरंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि रेडिओ अँड टेलीव्हिजन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ डोमेस्टिक  अ‍ॅप्लायन्सेस विषयातील इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा १२ वी (विज्ञान – फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स विषयांसह) उत्तीर्ण.

ग्रुप-बी पदे –

(९) नायब सुभेदार (रिलिजिअस टिचर) – १ पद (खुला).

पात्रता : मध्यमा (संस्कृत)/भूषण (हिंदी) पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी) पद क्र. १ ते ४ आणि ८ साठी १८-२३ वर्षे; पद क्र. ५ ते ७ साठी १८-२५ वर्षे; पद क्र. ९ साठी १८-३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे) (आसाम रायफल्सचे कर्मचारी क्लर्क पदासाठी – ३५ वर्षे, रिलिजिअर टिचर पदासाठी – ४० वर्षे/४५ वर्षे).

आसाम रायफल्समध्ये कार्यरत असलेले उमेदवार पात्र असल्यास हवालदार क्लर्क आणि सुभेदार (रिलिजिअस टीचर) पदांसाठी अर्ज करू शकतात, त्यांना  Col ( Rec),  HQ,  DGAR यांचेकडील  NOC शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

निवड पद्धती :

(१) शारीरिक मापदंड (PST) – सर्व पदांसाठी (हवालदार क्लर्क आणि हवालदार आया पद वगळता) – उंची – १७० सें.मी. (अजसाठी – १६२.५ सें.मी.)

छाती – ८०-८५ सें.मी. (अजसाठी ७६-८१ सें.मी.)

हवालदार क्लार्क पदासाठी – पुरुष – उंची – १६५ सें.मी. (अजसाठी १६२.५ सें.मी.)

पुरुष – छाती – ७७-८२ सें.मी. (अजसाठी ७६-८१ सें.मी.) महिला – उंची – १५५ सें.मी. (अजसाठी १५० सें.मी.)

हवालदार आया पदांसाठी – महिला – उंची – १५७ सें.मी. (अजसाठी १५० सें.मी.)

वजन – मेडिकल स्टँडर्डसप्रमाणे उंची आणि वय यांच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असावे.

(२) शारीरिक क्षमता चाचणी (PET) – कागदपत्र पडताळणीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल.

पुरुष – ५ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावणे. महिला – १.६ कि.मी. अंतर ८.३० मिनिटांत धावणे.

(३) ट्रेड टेस्ट (स्किल टेस्ट) :  PST/ PET मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची ट्रेड (स्किल) टेस्ट घेतली जाईल. यासाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. ट्रेड (स्किल) टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

(४) लेखी परीक्षा : १०० गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. पात्रतेसाठी खुला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ३५% गुण आणि अजा/ अज/ इमाव उमेदवारांनी ३०% गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेतून १:४ प्रमाणात उमेदवार डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) साठी निवडले जातील.

(५)  DME मध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना रिह्यू मेडिकल एक्झामिनेशन मागता येईल.

(६) गुणवत्ता यादी आणि ट्रेनिंगसाठी कॉल लेटर – कॅटेगरी आणि ट्रेडनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी कॉल लेटर दिले जाईल.

परीक्षा केंद्र : उमेदवारांना (PST/PET/ लेखी परीक्षा) पुढील केंद्रांवर घेतली जाईल. याविषयी माहिती  www. assamrifles.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल.  Diphu (Assam),  karbianglong (Assam),  Sukhovi (Nagaland),  Dimapur (Nagaland),  Silchar,  Masimpur (Assam),  Haflond (Assam). अर्जाचे शुल्क : ग्रुप-सी पदांसाठी (पद क्र. १ ते ८ साठी) रु. १००/-, ग्रुप-बी रिलिजिअस टिचर पद क्र. ९ साठी रु. २००/- (अजा/ अज/ महिला/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) अर्जाचे शुल्क ऑनलाईन मोडने अथवा  रइक चलानद्वारे भरता येईल. ऑनलाईन अर्ज  www.assamrifles.gov.in या संकेतस्थळावर ६ जून २०२२ ते २० जुलै २०२२ (२३.५९ वाजे) पर्यंत भरता येतील.