सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

सीएसआयआर-सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (CSIR- CEERI) ( A Premier Research &  Development Institute) (मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारत सरकार) पिलानी, राजस्थान (Advt.  No. ०१ / २०२२). टेक्निकल आणि सपोर्ट स्टाफची भरती. एकूण रिक्त पदे – ३५. ( क) टेक्निशिअन (१) – २४ पदे (अजा – ४, अज – ३, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, दिव्यांग –  ऌऌ-१, खुला -१०).

वेतन – दरमहा रु. २७,२४८ / -.

ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील (पोस्ट कोडसह) –

(१) रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशिनग -१ पद (खुला) ( TECH-१).

(२) इलेक्ट्रिशियन – ४ पदे (अजा – २, खुला – २) ( TECH-२).

(३) प्लंबर -१ पद (इमाव) ( TECH-३).

(४) मेसॉन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन) -१ पद (इमाव) ( TECH-४).

(५) टूल्स अँड डाय मेकर (प्रेस टूल्स, जिग्स अँड फिक्चर्स) -१ पद (इमाव) ( TECH-५).

(६) टर्नर – २ पदे (खुला -१, इमाव -१) ( TECH-६).

(७) फिटर – ३ पदे (अज -१, ईडब्ल्यूएस -१, खुला -१) ( TECH-७).

(८) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ४ पदे (अजा -१, ईडब्ल्यूएस -१, खुला – २) ( TECH-८).

(९) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) – ४ पदे (अज -१, दिव्यांग –  HH-१, खुला – २) (TECH-९).

(१०) केमिकल प्लांट – ३ पदे (अजा -१, अज -१, खुला -१) (TECH-१०). TECH

पात्रता – (दि. १ मार्च २०२२ रोजी) १० वी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा २ वर्ष कालावधीची संबंधित ट्रेडमधील नॅशनल अ‍ॅप्रेंटिस ट्रेनिंग.

(II) टेक्निकल असिस्टंट -११ पदे (अजा – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस -१, दिव्यांग –  VH-१, खुला – ४).

वेतन – दरमहा रु. ४८,७३२ / -.

(१) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) – २ पदे (ईडब्ल्यूएस -१, खुला -१) ( TA-१).

(२) टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) – २ पदे (अजा -१, इमाव -१) ( TA-२).

(३) टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल) – २ पदे (इमाव -१, खुला -१) ( TA-३).

(४) टेक्निकल असिस्टंट (कॉम्प्युटर / आयटी) – ५ पदे (अजा -१, इमाव -१, दिव्यांग –  VH-१, खुला – २) (TA-४).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १ मार्च २०२२ रोजी २८ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा / अज – ५ वर्षे, दिव्यांग -१० / १३ / १५ वर्षे)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल. ट्रेड टेस्टमधून शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना स्पर्धात्मक लेखी परीक्षेसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार.

लेखी परीक्षा ३ पेपर्स. (पेपर-१, पेपर-२ व पेपर-३)

ज्या उमेदवारांना नेमून दिलेले किमान पात्रतेचे गुण पेपर-१ मध्ये मिळतील. त्यांचेच पेपर-२ व पेपर-३ तपासले जातील. अंतिम निवड पेपर-२ व पेपर-३ मधील गुणवत्तेनुसार केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु.१०० / -. (अजा / अज / दिव्यांग / महिला / माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज  www.ceeri.res.in या संकेतस्थळावर दि.१ मार्च २०२२ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत. (एकपेक्षा अधिक पदांसाठी (पोस्ट कोडनुसार) वेगवेगळे अर्ज करावे लागतील.) (जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमानुसार आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावयाची आहेत.)

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC Limited) (भारत सरकारचा उपक्रम), हैद्राबाद (Employment Notification No. ०४ / २०२२).

ट्रेनी कर्नाटक राज्यातील दोनिमलाई (Donimalai) कॉप्लेक्समध्ये पुढील एकूण २०० ट्रेनी पदांची भरती.

(१) फिल्ड अटेंडंट ट्रेनी ( RS-०१) – ४३ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – ११, ईडब्ल्यूएस – ५, खुला – १७) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी  LV/ D &  HH/LD / MD साठी राखीव).

पात्रता – ५ वी उत्तीर्ण किंवा आयटीआय.

(२) मेंटेनन्स असिस्टंट (मेक) ट्रेनी (RS-०२) – ९० पदे.

(i) फिटिंग – ३० पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).

(ii) वेल्डिंग – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ६).

(iii) मोटार / डिझेल मेकॅनिक – ३७ पदे (अजा – ६, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १५).

(iv) मशिनिस्ट – ४ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – १).

(v) ऑटो इलेक्ट्रिशियन – ४ पदे (इमाव – १, खुला – ३).

पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.

(३) मेंटेनन्स अटेंडंट  (इलेक्ट्रिक) ट्रेनी (RS-०२) – ३५ पदे (अजा – ६, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १३).

पात्रता – इलेक्ट्रिकल ट्रेडमधील आयटीआय.

(४)  MCO Gr III (ट्रेनी) (RS-०४) – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).

(५)  HEM Mechanic Gr III (ट्रेनी) ( RS-०४) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

पात्रता – पद क्र. ४ व ५ साठी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा. इष्ट पात्रता – अवजड वाहन चालविण्याचा परवाना.

(६) इलेक्ट्रिशियन ग्रेड– iii RS (ट्रेनी) ( RS-०४) – ७ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि इंडस्ट्रियल / डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स सर्टिफिकेट.

(७) ब्लास्टर ग्रेड- ii (ट्रेनी) ( RS-०४) – २ पदे (अजा – १, इमाव – २).

पात्रता – १० वी / आयटीआय (ब्लास्टर / मायिनग मेट सर्टिफिकेट आणि फस्र्ट एड सर्टिफिकेटसह) आणि ब्लास्टिंग ऑपरेशनमधील ३ वर्षांचा अनुभव.

(८) QCA Gr – iii (ट्रेनी) ( RS-०४) – ९ पदे (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

पात्रता – बी.एससी. (केमिस्ट्री / जीऑलॉजी) आणि सॅम्पिलग वर्कचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. २ मार्च २०२२ रोजी ३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षे, अजा / अज – ३५ वर्षे, दिव्यांग – ४० / ४३ / ४५ वर्षे)

ट्रेनिंगचा कालावधी व स्टायपेंड – ट्रेनिंग कालावधी १८ महिने. (पद क्र. १ ते ३ साठी स्टायपेंड) पहिले सहा महिने रु. १८,००० / -, नंतरचे १२ महिने रु. १८,५०० / -.

इतर पदांसाठी स्टायपेंड दरमहा पहिले सहा महिने रु. १९,००० / -, नंतरचे १२ महिने रु. १९,५०० / -.

वेतन – ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना संबंधित पदावर कायम केले जाईल.

क्र. १ ते ३ पदांवरील ट्रेनीजना वेतन श्रेणी १८,१०० / – ३% ३१,८५० / -.

क्र. ४ ते ८ पदांवरील ट्रेनीजना वेतन श्रेणी १९,९०० / – ३% ३५,०४० / -.

निवड पद्धती –

पद क्र. ९ साठी (१) लेखी परीक्षा आणि (२) शारीरिक क्षमता चाचणी (PAT).

इतर पदांसाठी (१) लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट.

लेखी परीक्षा १०० गुणांसाठी घेतली जाईल.PAT/ ट्रेड टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल. लेखी परीक्षेचा पेपर हिंदूी / इंग्रजी /  कन्नड भाषेतील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.

पद क्र. १ साठी (फिल्ड अटेंडंट) (जनरल नॉलेज – ७० गुण व न्यूमरिकल अँड रिझनिंग अ‍ॅबिलिटी – ३० गुण).

इतर पदांसाठी ट्रेड संबंधित नॉलेज – ३० गुण आणि जनरल नॉलेज – ५० गुण व न्यूमरिकल अँड रिझिनग अ‍ॅबिलिटी  २० गुण.

लेखी परीक्षेत किमान पात्रतेचे गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना रिक्त पदांच्या १:३ प्रमाणात  PAT / ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल. अजा / अज / इमाव सर्टिफिकेट्स जर हिंदूी / इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेत दिलेले असल्यास उमेदवारांना त्याची स्वयंसाक्षांकित इंग्रजी / हिंदूी भाषेतील भाषांतरित प्रत सादर करावी लागेल.

http://www.nmdc.co.in वेबसाइटवरील Career पेजवरील जाहिरातीमध्ये दिलेल्या फॉरमॅटमध्ये संबंधित दाखले असावेत. (इमाव –  Annexure- III, अजा / अज –  Annexure- II, ईडब्ल्यूएस –  Annexure- IV)).

अर्जाचे शुल्क – रु. १५० / -. (अजा / अज / दिव्यांग / माजी सैनिक यांना शुल्क माफ आहे.)

भरती प्रक्रियेसंबंधित माहिती NMDC च्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल.

कागदपत्र पडताळणी  PAT / ट्रेड टेस्टच्या वेळी घेतली जाईल.

ऑनलाईन अर्ज  www.nmdc.co.in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ (२३.५९ वाजे)पर्यंत भरता येतील. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक. शंका समाधानासाठी हेल्प लाइन ई-मेल –  nmdc@jobapply.in