सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) (भारत सरकारचा संरक्षण मंत्रालयांतर्गत एक उपक्रम) मुंबई अ‍ॅप्रेंटिसेस अ‍ॅक्ट, १९६१ अंतर्गत ८ वी/१० वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची वर्ष २०२१ करिता व्यवसाय प्रशिक्षणार्थी (ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस)च्या एकूण ४२५ पदांवर निवड. (Advt. No. MDLATS/०२/२०२१) ग्रुप सी’ (इयत्ता ८ वी उत्तीर्ण) पात्रता असलेली पदे –

(१) रिगर – ४७ पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – १३, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २१).

प्रशिक्षण कालावधी – २ वर्ष.

(२) वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) – २६ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३). प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष ३ महिने.

पात्रता – पद क्र. १ व २ साठी इ. ८ वी (गणित आणि विज्ञान विषयांसह) किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट नाही.) उच्चशिक्षित उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १४ ते १८ वर्षे.

प्रतिमाह स्टायपेंड – प्रशिक्षणा दरम्यान पहिल्या तीन महिन्यांसाठी रु. २,५००/-, त्यानंतर रु. ५,०००/- आणि दुसऱ्या वर्षी रु. ५,५००/- स्टायपेंड दिले जाईल.

ग्रुप ‘ए’ (इ. १० वी उत्तीर्ण) पात्रता असलेली पदे – प्रशिक्षण कालावधी – २ वर्षे.

(१) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – २० पदे (अजा – २, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९).

(२) इलेक्ट्रिशियन – ३४ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १५).

(३) फिटर – ६२ पदे (अजा – ८, अज – ४, इमाव – १८, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २६).

(४) पाईप फिटर – ७२ पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३१).

(५) स्ट्रक्चरल फिटर – ६३ पदे (अजा – ८, अज – ४, इमाव – १८, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २७).

पात्रता – पद क्र. १ ते ४ साठी (i) १० वीची परीक्षा (विज्ञान आणि गणित विषयासह) किमान सरासरी ५०%गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी गुणांची अट लागू नाही. उच्चशिक्षित उमेदवार देखील अर्ज करू शकतात.) पाईप फिटर पदासाठी १० वीला विज्ञान व गणित विषय असणे अनिवार्य नाही.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १५ ते १९ वर्षे.

प्रतिमाह स्टायपेंड – प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना पहिल्या वर्षी पहिले ३ महिने रु. ३,०००/-, त्यानंतर रु. ६,०००/- व दुसऱ्या वर्षी रु. ६,६००/- स्टायपेंड दिले जाईल.

ग्रुप बीआयटीआय परीक्षा उत्तीर्ण पात्रता असलेली पदे – प्रशिक्षण कालावधी १ वर्ष.

(१) फिटर स्ट्रक्चरल – २० पदे (अजा – २, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९).

(२) इलेक्ट्रिशियन – १५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

(३) पाईप फिटर – १५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

(४) वेल्डर – १५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

(५) कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) – १५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

(६) कारपेंटर – २१ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १०).

पात्रता – पद क्र. १ ते ६ साठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा किमान सरासरी ५०%गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/ दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट नाही.) आयटीआय अंतिम परीक्षेचा निकाल लागला नसल्यास उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

ग्रुप ‘ए’ (१० वी उत्तीर्ण) व ग्रुप ‘सी’ (८ वी उत्तीर्ण) च्या पदांसाठी आयटीआय पात्रताधारक उमेदवार पात्र नाहीत.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १६ ते २१ वर्षे.

स्टायपेंड – फिटर स्ट्रक्चरल (ए७ कळक) आणि इलेक्ट्रिशियन पदांसाठी रु. ८,०५०/- दरमहा. इतर पदांसाठी रु. ७,७००/- दरमहा

सर्व पदांसाठी वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

सुट्टी – शिकाऊ उमेदवारांना एका वर्षांत १२ प्रासंगिक रजा व १५ दिवसांची वैद्यकीय रजा दिली जाईल.

निवड पद्धती – प्रशिक्षणार्थीची प्रवेश प्रक्रिया ३ टप्प्यांत संपन्न होईल.

पहिला टप्पा – ऑनलाइन परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट – CBT) १०० प्रश्न, १०० गुणांसाठी वेळ २ तास.

ग्रुप १० वी उत्तीर्ण व ग्रुप सी८ वी उत्तीर्ण ट्रेड्ससाठी – ४ विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न (१) इंग्लिश व जनरल नॉलेज, (२) फिजिक्स, (३) केमिस्ट्री व (४) गणित.

ग्रुप बीआयटीआय उत्तीर्ण ट्रेड्ससाठी – ४ विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न. (१) इंग्लिश व जनरल नॉलेज, (२) ट्रेड थिअरी, (३) वर्कशॉप कॅलक्युलेशन आणि विज्ञान, (४) इंजिनीअरिंग ड्रॉइंग. एकूण १०० प्रश्न, १०० गुण.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद.

दुसरा टप्पा वैद्यकीय तपासणी तसेच कागदपत्र पडताळणी. प्रत्येक ग्रुपमधील ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

तृतीय टप्पा – ट्रेड वितरण प्रक्रियेसाठी केवळ सक्षम मेडिकल फिटनेस सर्टििफकेट प्राप्त व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी पार पडलेल्या उमेदवारांनाच बोलाविण्यात येईल. उमेदवार अनुपस्थित राहिल्यास आणि ट्रेड निवडण्यात असफल ठरल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- आणि बँक शुल्क. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे, त्यांनी जातीचा दाखला, दिव्यांग दाखला अपलोड करणे आवश्यक.)

पुरुष/महिला प्रशिक्षणार्थीना ड्रेसकोडचे पालन करावे लागेल.

उमेदवारांना वसतीगृहाची सुविधा पुरविली जाणार नाही.

पात्र उमेदवारांची यादी दि. १६ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर केली जाईल.

पात्रता अयोग्यतेसंबंधी तक्रार करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२१.

ऑनलाईन परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड/हॉल तिकीट २३ ऑगस्ट, २०२१ पासून जारी केले जातील.

ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट, २०२१ च्या चौथ्या आठवडय़ात आयोजित केली जाईल. या भरतीसंबंधी अपडेट्ससाठी उमेदवारांनी https://mazagondock.in/Career-Apprentice.aspx या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.

रजिस्ट्रेशन संबंधित माहितीसाठी mdlats@mazdock.com किंवा फोन नं. ०२२-२३७६४१५५/४१५१ वर संपर्क साधा. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.०० ते संध्या. ४.०० वाजेदरम्यान.

उमेदवार ग्रुप-ए (१० वी उत्तीर्ण) व ग्रुप-सी (८ वी उत्तीर्ण) पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज https://mazagondock.in या संकेतस्थळावरील Career/Online Recruitment Apprentices या लिंकमधून Create New Account वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा व अर्जाकरिता लॉगइन करून अ‍ॅप्लाय करा. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक.

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे १० ऑगस्ट २०२१.