सुहास पाटील suhassitaram@yahoo.com
सीमा सुरक्षा बल (SSB) (गृह मंत्रालय, भारत सरकार) मध्ये पुरुष व महिला उमेदवारांची ‘हेड काँस्टेबल (मिनिइस्ट्रयल)’ ग्रुप-सीच्या एकूण ११५ पदांची भरती. (अजा – २१, अज – १०, इमाव – २६, ईडब्ल्यूएस् – ११, खुला – ४७) १०% जागा माजी सनिकांसाठी राखीव आहेत.

(Advt. No.  338/RC/SSB/HC/Min/ 2020 )

पदाचे नाव – हेड काँस्टेबल (मिनिइस्ट्रयल). वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ३२,६४०/- अधिक इतर भत्ते.

पात्रता – (i) १२ वी उत्तीर्ण, (ii) कॉम्प्युटरवरील स्किल टेस्टचे निकष – इंग्लिश टायपिंग – ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग – ३० श.प्र.मि.

वयोमर्यादा – दि. २२ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे)

परीक्षा शुल्क – रु. १००/-. (अजा/अज/माजी सनिक/महिला यांना शुल्क माफ.)

निवड पद्धती – पात्र उमेदवारांना http://www.ssbrectt.gov.in या  संकेतस्थळावर अ‍ॅडमिट कार्ड जारी केले जातील. भरतीच्या ठिकाणी बायोमेट्रिक अटेंडन्स, डिजिटल छायाचित्र, स्वाक्षरी आणि निशाणी अंगठा घेण्यात येईल.

(I) शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मापदंड चाचणी (PST) – SSB च्या लोकेशन्सवर घेतल्या जातील.

(A) PET – पुरुष – १.६ कि.मी. अंतर ६ मिनिटे ३० सेकंदांत धावणे. महिला – ८०० मीटर अंतर ४ मिनिटांत धावणे.

(ब) शारीरिक मापदंड चाचणी (ढरळ) – पुरुष – उंची – १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.) महिला – उंची – १५५ सें.मी. (अज – १५० सें.मी.) छाती – पुरुष – ७७ ते ८२ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.)

PST मध्ये अनुत्तीर्ण झालेले उमेदवार अपिलेट अथॉरिटीला उंची व छाती पुन्हा मोजण्यासाठी लेखी अर्ज करू शकतात. अपिलाचा निकाल त्याच दिवशी देण्यात येईल.

(II) लेखी परीक्षा – कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २ तास कालावधी, १०० गुणांसाठी १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न (जनरल नॉलेज, गणित, रिझिनग आणि जनरल इंग्लिश/जनरल हिंदी) अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील गुणानुक्रमे बनविली जाईल.

(III) स्किल/टायपिंग टेस्ट – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १५ पट उमेदवारांना बोलाविले जाईल.

(IV) कागदपत्र पडताळणी आणि डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) – कॅटेगरीनुसार रिक्त पदांच्या ३ पट उमेदवार बोलावले जातील. DME मध्ये पात्र न ठरलेले उमेदवार रिव्ह्य़ू मेडिकल एक्झामिनेशनकरिता विहीत नमुन्यात अर्ज करू शकतात.

प्रोव्हिजनली निवडलेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधीमध्ये ट्रेिनग कोर्स वेळोवेळी पूर्ण करावा लागेल.

अर्जासोबत (i) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र  (४ KB to १२ KB JPG Format of १०० Pixel width १२० Pixel height) आणि (ii) सिग्नेचर (४ KB to १२ KB JPG Format १४० Pixel width ६० Pixel height) स्कॅन करून अपलोड करावेत. त्यानंतर उमेदवारांनी रजिस्ट्रेशन नंबर नोट करावा किंवा अ‍ॅक्नॉलेजमेंटची पिंट्र काढून घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी http://www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या  त्यासंबंधित सूचना नीट वाचून त्याप्रमाणे अर्ज दि. २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावा.

प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स यांचे कार्यालय, आयकर भवन, एम.के. रोड, मुंबई – ४०० २०१ येथे स्पोर्ट्स कोटाअंतर्गत एकूण १५५ गुणवान खेळाडूंची पुढील पदांवर भरती.

(Sports Quota Recruitment – 2021 Advt. dt. 8th July 2021)

(१) इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स – ८ पदे.

वेतन – पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ६९,०००/-.

पात्रता – पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १८-३० वर्षे.

(२) टॅक्स असिस्टंट – ८३ पदे.

वेतन – पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ४६,०००/-.

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि डेटा एन्ट्री स्पीड – ८,००० की डिप्रेशन्स प्रति तास.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १८-२७ वर्षे.

(३) मल्टी टास्किंग स्टाफ – ६४ पदे.

वेतन – पे-लेव्हल – १, अंदाजे वेतन दरमहा रु. २९,०००/-.

पात्रता – १० वी उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी १८-२५ वर्षे.

वयोमर्यादेत सूट – सर्व पदांसाठी – खुला व इमाव – ५ वर्षे; अजा/अज – १० वर्षे, (३ वर्षांची सेवा असलेले केंद्र सरकारी कर्मचारी – खुला गट – ४० वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे).

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना कागदपत्र पडताळणी किंवा ग्राऊंड/प्रोफिशियन्सी टेस्टच्या वेळी पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक असेल.

पुढील खेळांतील प्रावीण्य प्राप्त उमेदवारांची भरती –

(१) अ‍ॅथलेटिक्स (१०० मीटर, …, १०,००० मीटर, १०० मीटर हर्डल, लांब उडी, ट्रिपल जंप, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, हातोडा फेक, उंच उडी, पोल वॉल्ट इ.)

(२) स्विमिंग – १०० मीटर (बटरफ्लाय/ब्रेस्ट स्ट्रोक/बॅक स्ट्रोक/फ्री स्टाइल)

(३) स्क्वॅ श

(४) बिलियर्ड्स

(५) चेस

(६) कॅरम

(७) ब्रिज

(८) बॅडिमटन

(९) लॉन टेनिस

(१०) टेबल टेनिस

(११) शूटिंग

(१२) वेट लिफ्टिंग

(१३) कुस्ती

(१४) बॉक्सिंग

(१५) ज्युडो

(१६) जिम्नॅस्टिक्स

(१७) व्हॉलिबॉल

(१८) बास्केटबॉल

(१९) कबड्डी

(२०) क्रिकेट

(२१) फुटबॉल

(२२) बॉडी बिल्डिंग (७० किलोपर्यंत/७० किलो ते ८० किलो)

अनु. क्र. १७ ते २२ वरील खेळांसाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.

निवडीसाठी खेळाडूंची पात्रता –

(i) राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व.

(ii) इंटर युनिव्हर्सटिी स्पोर्ट्स बोर्डाने आयोजित केलेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धामधील विद्यापीठाचे प्रतिनिधित्व.

(iii) ऑल इंडिया स्कूल गेम्स फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामधील राज्य शालेय टीमचे प्रतिनिधित्व.

(iv) नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राइव्ह अंतर्गत फिजिकल इफिशियन्सीमधील राष्ट्रीय पारितोषिक.

जाहिरातीमध्ये कोणत्या स्पर्धातील सहभागासाठी कोणत्या अ‍ॅथॉरिटीने सर्टििफकेट, कोणत्या फॉर्ममध्ये दिलेले असावे ते नमूद केलेले आहे. संबंधित फॉम्र्स उमेदवार संके तस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. पूर्ण भरलेला फॉर्म (संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून सही केलेला) आणि आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करावयाचा आहे.

निवड पद्धती – अर्जाची छाननी करून योग्य उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी निवडले जातील. निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. गरज वाटल्यास ग्राऊंड/प्रोफिशियन्सी टेस्ट उमेदवारांना द्यावी लागेल.

टॅक्स असिस्टंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना संगणक कौशल्य चाचणी द्यावी लागेल.

उमेदवारांनी फक्त एकच अर्ज करावयाचा आहे. अर्जामध्ये पदांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

ऑनलाइन अर्ज http://www.incometaxmumbai.gov.in   किंवा  https://www.incometaxmumbai.in/ या संकेतस्थळावर दि. २५ ऑगस्ट २०२१ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.