नोकरीची संधी  

इंडिया पोस्ट (मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन) २३ पोस्टल सर्कल्समध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांची भरती.

mpsc exam

सुहास पाटील

इंडिया पोस्ट (मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन) २३ पोस्टल सर्कल्समध्ये ग्रामीण डाक सेवकपदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ३८,९२६.

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ‘ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)’, ‘असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)/डाक सेवक (DS)’च्या एकूण ३,०२६ पदांची भरती. (अजा- ३०२, अज – २९३, इमाव – ७५४, ईडब्ल्यूएस – २६४, दिव्यांग – ए – १२, बी – २०, सी – ४७, डी ई – १०, खुला – १३२४)

पदनिहाय कामाचे स्वरूप :

(१) ब्रँच पोस्टमास्टर (BPM) : ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्ट ऑफिसचे काम सांभाळणे. इंडिया पोस्ट्स पेमेंट्स बँक (IPPB) चे काम सांभाळणे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील/ ग्रामपंचायतीमधील पोस्टाचा व्यवसाय सांभाळणे ब्रँच पोस्ट मास्टर हा ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसचा प्रमुख असणार.

(२) असिस्टंट ब्रँच मास्टर (ABPM) : स्टॅंप/स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण,  कढढइ च्या कामात व पोस्टाच्या इतर कामात ब्रँच पोस्ट मास्टरना मदत करणे.

(३) डाक सेवक (DS) : स्टँप/स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण व्यवस्था सांभाळणे. ब्रँच पोस्ट मास्टर/ असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर्सनी दिलेली इंडिया पोस्ट पेमेंट बँक व इतर पोस्टाची कामे करणे.

पात्रता : सर्व पदांसाठी – (i) १० वी (एसएससी) उत्तीर्ण (गणित, स्थानीय भाषा आणि इंग्रजी विषयांसह).

(ii) पोस्टल सर्कलसाठी नेमलेली ऑफिशियल लँग्वेज उमेदवारांना अवगत असणे आवश्यक. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील उमेदवारांसाठी ऑफिशियल लँग्वेज ही मराठी आहे. कर्नाटकसाठी कन्नड, गोव्यासाठी कोंकणी/ मराठी, मध्य प्रदेशसाठी हिंदी, गुजरातसाठी गुजराती.

(iii) उमेदवारांनी डिपार्टमेंटल सॉफ्टवेअरवर काम करण्यासाठी कॉम्प्युटर/ लॅपटॉप/ POS/ मोबाईल इ. चालविण्याचे पुरेसे ज्ञान असल्याचे घोषणापत्र  Annexure- II मधील नमुन्यात दाखल करणे आवश्यक आहे.

(ब्रँच पोस्ट मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपल्या कार्यक्षेत्रात ब्रँच पोस्ट ऑफिससाठी निवड झाल्यानंतर व कामास सुरूवात करण्यापूर्वी जागा मिळवून द्यावी लागेल.)  BPM पदांवरील उमेदवारांना पोस्टाच्या गावी रहावे लागेल.  ABPM/ डाक सेवक पदांवरील उमेदवारांना पोस्ट ऑफिसच्या वितरण अधिकार क्षेत्रात राहणे आवश्यक.

(iv) उमेदवारांना सायकल चालविता येणे बंधनकारक आहे. सायकल ऐवजी स्कूटर/ मोटर सायकल चालविता येत असेल तरी चालेल. यासाठी उमेदवारांनी  Annexure- III मधील घोषणापत्र सादर करणे आवश्यक.

विकलांग कॅटेगरी क्षीण दृष्टी, कर्णबधिर, एक हात, एक पाय, कुष्ठरोग मुक्त, अ‍ॅसिड हल्लाबाधित उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. काही पदे विकलांगांसाठी राखीव आहेत.

(v) उमेदवारांनी उपजीविकेसाठी पुरेशी साधनं (Adequate means of livelihood) उपलब्ध असल्याबाबतचं घोषणापत्र  Annexure- IV मध्ये द्यावयाचे आहे.

(vi) तसेच ऑनलाइन अर्जात दिलेली माहिती खरी असल्याबाबतचं घोषणापत्र  Annexure- V मध्ये सादर करावयाचे आहे.

वयोमर्यादा : दि. ५ जून २०२२ रोजी १८ ते ४० वर्षे. (इमाव – ४३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४५ वर्षेपर्यंत, विकलांग उमेदवार – खुला गट – ५० वर्षेपर्यंत, इमाव – ५३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५५ वर्षेपर्यंत). ईडब्ल्यूएस उमेदवारांना वयात कोणतीही सूट नाही याची नोंद घ्यावी.

टाइम रिलेटेड कंटीन्यूइटी अलाऊन्स (TRCA) (एकत्रित मानधन) : (१) किमान ४ तासांसाठी (TRCA Level r) ब्रँच पोस्ट मास्टर्स (BPM) यांना दरमहा रु. १२,०००/- व  ABPM/ डाक सेवक यांना रु. १०,०००/- TRCA दिले जातील.

अर्जाचे शुल्क : रु. १००/- (खुलागट, इमाव, ईडब्ल्यूएस). (निवडलेल्या डिव्हीजनमधील सर्व पदांच्या पसंतीसाठी) महिला/ अजा/ अज विकलांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.

निवड पद्धती : इ. १० वी (एसएससी) मधील गुणवत्तेनुसार आणि उमेदवारांनी पदांसाठी दिलेल्या पसंतीक्रमाप्रमाणे निवड केली जाईल. समान गुण असल्यास जन्म तारखेनुसार, अज-महिला, अजा-महिला, इमाव-महिला, ईडब्ल्यूएस-महिला, खुलागट-महिला, अज-पुरुष, अजा-पुरुष, इमाव-पुरुष, ईडब्ल्यूएस-पुरुष, खुला गट-पुरुष या क्रमाने प्राधान्य दिले जाईल. अंतरिम निवड यादीनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. निवड प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केली जाईल.

उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही प्राधान्य देण्यात येणार नाही.

उमेदवार रजिस्ट्रेशन नंबर आणि OTP देवून अर्ज करण्यासाठी फक्त एकच डिव्हीजन निवडू शकतात. डिव्हीजन निवडल्यानंतर त्या डिव्हीजनमधील पात्र पदांची यादी स्क्रीनवर डिस्प्ले होईल, त्यानुसार उमेदवारांनी पदांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे. ज्या पदासाठी उमेदवाराने पसंतीक्रम दिलेला नाही त्या पदासाठी त्याचा विचार केला जाणार नाही.

डिव्हीजननुसार GDS ची रिक्त पदे द्यावयाची आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले नाव  https://indiapostgdsonline.gov.in या पोर्टलवर दि. ५ जून २०२२ पर्यंत रजिस्टर करावयाचे आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. (१) फोटो (jpg/ jpeg format upto 50  kb), (६) स्वाक्षरी jpg/ jpeg format upto 20kb).

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunities in maharashtra job opportunities in india zws 70

Next Story
एमपीएससी मंत्र : राज्य सेवा पूर्वपरीक्षा -चालू घडामोडी
फोटो गॅलरी