||  सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (फउा) (भारत सरकारचा उपक्रम). आपल्या ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ (अलिबाग), रायगडमधील ऑपरेंटिंग युनिट्समध्ये अ‍ॅप्रेंटिसेस अ‍ॅक्ट, १९६१ अंतर्गत एकूण १०४ ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेसची भरती.

(ए) रिजनल डायरेक्टोरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रिन्युअरशीप (फऊरऊए) अंतर्गत येणारी ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस पदे – एकूण ८५ पदे.

(१) एक्झिक्युटिव्ह (ह्युमन रिसोर्स) ट्रेनी – १० पदे. प्रशिक्षण कालावधी – १४ महिने.

पात्रता-पदवी उत्तीर्ण. (इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक)

(२) अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) ट्रेनी – ६० पदे. प्रशिक्षण कालावधी १ वर्ष.

पात्रता – (दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी) बी.एस्सी. (केमिस्ट्री) (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी विषयांसह) उत्तीर्ण.

(३) एक्झिक्युटिव्ह अकाऊंटंट ट्रेनी – १० पदे. प्रशिक्षण कालावधी – १४ महिने. पात्रता – १२ वी (कॉमर्स) उत्तीर्ण किंवा पदवी आणि फिनान्शियल सेक्टरमधील २ वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम बी.बी.ए./इकॉनॉमिक्समधील पदवी.

(४) मेडिकल लॅब (पॅथॉलॉजी) ट्रेनी – ५ पदे. प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.

पात्रता – १२ वी (विज्ञान आणि गणित विषयासह) उत्तीर्ण.

(बी) बोर्ड ऑफ अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) अंतर्गत येणारी पदे – एकूण – १९ पदे. प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.

(७) डिप्लोमा (केमिकल) – ४ पदे.

(८) डिप्लोमा (कॉम्प्युटर) – ५ पदे.

(९) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) – ५ पदे.

(१०) डिप्लोमा (मेकॅनिकल) – ५ पदे.

पात्रता – पद क्र. (बी) ७ ते १० साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका उत्तीर्ण.

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना किमान ४५% गुण आवश्यक)

वयोमर्यादा – (दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी) मेडिकल लॅब (पॅथॉलॉजी) ट्रेनी पदासाठी २१ वर्षे, इतर पदांसाठी २५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी उत्तीर्ण असणे आवश्यक. (ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसेस आणि टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिसेस पदांसाठी हजर होण्याच्या दिवशी पात्रता परीक्षा ३ वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली नसावी.)

दरमहा स्टायपेंड – १२ वी पात्रता असणाऱ्या पदांसाठी रु. ७,०००/-. टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिसेस किंवा डिप्लोमाधारक पात्रता पदांसाठी रु. ८,०००/-. ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसेस पदांसाठी रु. ९,०००/-.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी बनविली. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. कागदपत्रांच्या पडताळणीतून योग्य ठरलेल्या उमेदवारांना ट्रेड अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी पदावर नेमणूक दिली जाईल, त्यांना १ आठवड्याचा कालावधी जॉईन करण्यासाठी देण्यात येईल. दिलेल्या वेळेच्या पूर्वी निवडलेले उमेदवार जॉईन झाले नाहीत तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी बनविली जाईल. CGPA/CPI किंवा इतर ग्रेड्सचे टक्क्यांमध्ये रूपांतर करण्याचे संबंधित विद्यापीठ / संस्थेकडील सर्टिफिकेट रिपोर्टिंगच्या वेळी सादर करणे आवश्यक.

RCF च्या संबंधित युनिट्सच्या ५० कि.मी. परिघात राहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज  http://www.rcfltd.com  या संकेतस्थळावर ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान करावेत. (Recruitment >Engagement of Trade Apprentices – 2021 > I accept > Apply Online > Upload Coloured photograph (upto 75KB size) and signature (upto 25 KB) scanned copies jpg/jpeg format > save/submit > Print)

अर्जासोबत (छायाचित्र व स्वाक्षरी वगळता) इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करावयाची नाहीत. शंकासमाधानासाठी  tradeapprentices2021@rcfltd.com या ई-मेलवर संपर्क साधा.