नोकरीची संधी

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था(Advt. No.srqqv/RECT/sqsq dtd. 01.06.2021). पुढील ४२ पदांची भरती.

सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था(Advt. No.srqqv/RECT/sqsq dtd. 01.06.2021). पुढील ४२ पदांची भरती.

१) ज्युनियर असिस्टंट – ३० पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – १६, खुला – ५).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावरील प्रभुत्व (जसे की Windows/Network Operating System/LAN Architecture).

वेतन – पे-लेव्हल – २, अंदाजे दरमहा

रु. ३०,०००/-.

२) सिनियर असिस्टंट – ८ पदे (अजा – १, इमाव – ४, खुला – ३).

पात्रता – पदवी उत्तीर्ण. वेतन – पे-लेव्हल – ७, अंदाजे दरमहा रु. ६९,०००/-.

 

३) ज्युनियर अकाऊंटंट – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता – मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा कॉमर्समधील पदवी उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – शासकीय संस्थेतील अकाऊंट्सच्या कामाचा ३ वर्षांंचा अनुभव आणि कॉम्प्युटर बेस्ड् अकाऊंट्सचे ज्ञान.

वेतन – पे-लेव्हल – ४, अंदाजे दरमहा

रु. ४१,०००/-.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे (इमाव – ३० वर्षे, अजा/अज – ३२ वर्षे, दिव्यांग – ३७/३९/४१ वर्षे, विधवा/परित्यक्ता महिला – ३५ वर्षे (खुला गट), ४० वर्षे (अजा/अज)).

 

निवड पद्धती –

पहिली पायरी – कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट (CBT) ज्यात २०० वस्तुनिष्ठ प्रश्न, २०० गुणांसाठी, वेळ १८० मिनिटे (३ तास). (जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अप्टिटय़ूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी ५० प्रश्न, एकूण २०० प्रश्न.) प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.

दुसरी पायरी – कॉम्प्युटर नॉलेज/स्किल टेस्ट – १०० गुणांसाठी वेळ ७५ मिनिटे, अंदाजे ५०० शब्दांचा इंग्लिश भाषेतील उतारा १५ मिनिटांच्या कालावधीमध्ये कॉम्प्युटरवर जसाचा तसा  टाइप करावयाचा आहे. रिक्त पदांच्या ५ पट उमेदवार कॉम्प्युटर ज्ञान/ कौशल्य चाचणीसाठी स्टेज-१ CBT मधील कामगिरीवर आधारित निवडले जातील.

CBT च्या सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका पुढील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://g21.digialm.com:443/OnlineAssessment/index.html?1815@@M17

अंतिम निवड पहिल्या आणि दुसऱ्या पायरीमधील एकत्रित गुणांवर आधारित केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १,५००/- + जीएसटी (अजा/अज/दिव्यांग/महिला यांना शुल्क माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज  http://www.natboard.edu.in या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०२१ दरम्यान करावेत.

हेल्पलाइन ई-मेल vacancy@natboard.edu.in

ऑफिसर कमांडिंग, एफ्ओएल् डेपो, खडकी, पुणे  (HQ MG & G Area (ST) Branch)(संरक्षण मंत्रालय, भारत सरकार). पुढील ग्रुप-सी आणि ग्रुप-डीच्या एकूण १३ पदांची भरती.

(१) मजदूर – ६ पदे (५५  उ८ Coy ASC Super Type D  युनिटसाठी) (अज – १, इमाव – १, खुला – ३, एकूण ५ पदे) (२०४  Pet Pl ASC युनिटसाठी १ पद (इमाव)).

(२) चौकीदार – ५ पदे (५५  Coy ASC Supply Type D युनिटसाठी २ पदे (खुला) आणि २०४  Pet Pl ASC युनिटसाठी – ३ पदे (खुला)).

(३) सिव्हील मोटर ड्रायव्हर (CMD) – १ पद (अज (७५७ (१) Tpt Pl ASC (GV GT युनिटसाठी).

पात्रता – सर्व पदांसाठी १० वी उत्तीर्ण.  CMD पदांसाठी हलके व अवजड वाहन चालविण्याचा परवाना आणि २ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.) (चौकीदार पदांसाठी – इष्ट पात्रता – चौकीदाराच्या कामाचा १ वर्षांचा अनुभव.)

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. २३ जुलै २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे. (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३० वर्षे)

वेतन –  CMD पदासाठी पे-लेव्हल – २, अंदाजे वेतन दरमहा रु. २९,०००/-. मजदूर व चौकीदार पदांसाठी पे-लेव्हल – १, अंदाजे वेतन दरमहा रु. २७,०००/-.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न १५० गुणांसाठी  (OMR) (जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – २५ गुण, न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड – २५ गुण, जनरल इंग्लिश – ५० गुण, जनरल अवेअरनेस – ५० गुण). प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.

रिक्त पदांच्या १० पट उमेदवारांना लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार शारीरिक क्षमता चाचणी/स्किल टेस्टसाठी बोलाविले जाईल.

शारीरिक क्षमता चाचणी – फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

अर्जाचा विहित नमुना – एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ३ जुलै २०२१ च्या अंकात पान क्र. २२ व २५ वर उपलब्ध आहे. अर्ज ए-४ साईज पेपरवर असावा. तसेच  Acknowledgement/ Admission Card ए-४ साईज पेपरवर असावा.

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

(१) दोन अलिकडच्या काळात काढलेले पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, जे गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित  केलेले असतील. एक अर्जाच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात आणि दुसरा अ‍ॅक्नॉलेजमेंट कार्डवर चिकटविणे. गॅझेटेड ऑफिसरची सही अर्धी छायाचित्रावर आणि अर्धी अ‍ॅप्लिकेशन फॉर्मवर असेल.

(२) अर्जामध्ये नमूद केलेले सर्टिफिकेट्स स्वयंसाक्षांकित करून अर्जासोबत जोडावयाची आहेत. (शैक्षणिक पात्रतेसाठी १० वीचे प्रमाणपत्र, टेक्निकल पात्रता असल्यास त्याचा पुरावा, जातीचा दाखला, माजी सैनिकांसाठी Discharge Certificate, CMD  पदासाठी अवजड वाहन चालविण्याचा परवाना आणि दोन र्वष अनुभवाचा दाखला).

(३) दोन २८ ७१२ सें.मी. आकाराचे स्वत:चा पत्ता लिहिलेले लिफाफे ज्यावर प्रत्येकी रु. २५/- चे पोस्टल स्टँप्स लावलेले असतील.

पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसोबत पुढील पत्त्यावर दि. २३ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

‘Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki, Railway Station, Near Range Hills, Pin 411 020, Maharashtra.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Job opportunities ssh 93

Next Story
जबाबदारी ते उत्तरदायित्व
ताज्या बातम्या