गेल्या दोन-अडीच दशकांत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित  भरभराटीस आलेल्या कार्यक्षेत्राबद्दल म्हणजेच हेल्थकेअर क्षेत्रातील प्रगतीच्या संधींबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
हेल्थकेअर या संज्ञेचे स्वरूप खूप व्यापक आहे. रुग्णाच्या आजाराचे निदान, त्यावरील उपचार, आजाराशी सामना करण्यासाठी मानसिक आधार, आजारपणात आलेल्या शारीरिक व्यंगाशी जुळवून घेण्यासाठी शुश्रूषा किंवा रोगाला आळा घालण्यासाठी केलेली उपाययोजना, या आणि अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव हेल्थकेअर या क्षेत्रात होतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात वैद्यकीय उपचारांचे यश प्रामुख्याने हेल्थकेअर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अचूक निदान व सेवा यांवर अवलंबून असल्याचे आपल्या लक्षात येते. रोजगार संधींच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हेल्थकेअर हे कार्यक्षेत्र केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे ठरत आहे. हेल्थकेअर क्षेत्रांतील तज्ज्ञ वैद्यकीय क्षेत्राचे एक अविभाज्य अंग बनले आहेत. ते रुग्णांच्या रोगाचे निदान, औषधोपचार नियोजन याचबरोबर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही साहाय्यभूत ठरतात. हेल्थकेअर क्षेत्रातील शिक्षणक्रमांतर्गत प्रामुख्याने शुश्रूषा, रेडिओग्राफी, शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, बधिरीकरण तंत्रज्ञान (अ‍ॅनेस्थेशिया) अशा अनेक विद्याशाखांचा समावेश असतो. अनेक आजारांच्या चिकित्सेत व उपचारात मदत करण्यासाठी हेल्थकेअर तज्ज्ञांना, आधुनिक तंत्रज्ञान व त्याचे उत्तम उपायोजन शिकवले जाते. या कार्यक्षेत्राचे वाढते महत्त्व लक्षात घेता, देशातील अनेक शैक्षणिक संस्थांनी आरोग्यसेवेचे पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू केले आहेत.
शिक्षणक्रम
देशात आरोग्य निगा क्षेत्रातील शिक्षणक्रम पदवी, पदव्युत्तर त्याचप्रमाणे प्रमाणपत्र, पदविका, प्रगत पदविका, पदव्युत्तर पदविका अशा विविध स्तरांवर चालवले जातात. या शिक्षणक्रमांतून विषयांच्या पुस्तकी ज्ञानासोबत वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांबरोबर, तज्ज्ञ व्यक्तींबरोबर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. काही वेळा कामाच्या ठिकाणी नेमणूक झाल्यानंतर उमेदवारांना गरज भासेल त्या त्या वेळी ‘ऑनसाइट ट्रेिनग’ही दिले जाते.     
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी, औषधविज्ञानाशी निगडित अनेक शाखांतून विविध प्रकारचे शिक्षण घेऊ शकतात. उदाहरणार्थ- कार्डिओ व्हस्क्युलर टेक्नोलॉजी, काऊन्सिल्िग, डेंटल असिस्टन्ट, हायजिनिस्ट, इमर्जन्सी, मेडिकल टेक्निशियन, फिटनेस ट्रेनर, हेल्थकेअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हेल्थकेअर, इन्फॉम्रेशन मॅनेजमेंट, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशिअन, मसाज थेरपिस्ट ट्रेिनग, मेडिकल कोडिंग, बििलग, मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शिनिस्ट, नेचरोपथी ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फार्मसी टेक्निशिअन, पेशंट केअर टेक्निशिअन, प्रॅक्टिकल नìसग, सायकोलॉजी, मेंटल हेल्थ, रेडिओलॉजी, एक्स-रे टेक्निशिअन, रजिस्टर्ड नìसग, रिहॅबटेक्निशिअन, रेस्पिरेटरी थेरापिस्ट, सोनोग्राफी आणि अल्ट्रासाऊंड टेक्नोलॉजी, सर्जकिल टेक्नोलॉजी वगरे.
प्रगतीच्या संधी
या क्षेत्रातील शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी देशात आणि देशाबाहेर उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ रुग्णालये, आरोग्यकेंद्रे अशा आस्थापानांतून, मेडिकल असिस्टंट, डेंटल असिस्टन्ट, नर्स, मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शनिस्ट, इन्श्युरन्स कोडर, बिलर, मेडिकल ऑफिस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर वगरे.    
विविध शिक्षणसंस्था
ए.एन.सी. हॉस्पिटल मल्टि-पर्पज हेल्थवर्कर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, नंद्वरम (आंध्र प्रदेश), ए.एन.एम. ट्रेिनग सेंटर, बेहरामपूर (ओडिशा), ए.एन.एम. ट्रेिनग सेंटर, कानपूर (उत्तर प्रदेश), अ‍ॅकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस मल्टि-पर्पज हेल्थ वर्कर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, राजमुंद्री (आंध्र प्रदेश), अम्रित कौर  हॉस्पिटल, अजमेर (राजस्थान), आन्ध्र महिला सभा कॉलेज ऑफ नìसग, हैद्राबाद (आंध्र प्रदेश), अ‍ॅनी मल्टि-पर्पज हेल्थ वर्कर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, चिराला (आन्ध्र प्रदेश), अशोकनगर जनरल हॉस्पिटल (पश्चिम बंगाल), ऑरम इंटरनॅशनल हेल्थ केअर स्कूल, पटियाला (पंजाब).
आíथक प्राप्ती
आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आíथक कमाई ही त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव, यांवर अवलंबून असते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात, अंदाजे १० हजार रुपये इतके वेतन मिळणे अपेक्षित असते.
गीता कॅस्टेलिनो

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण