नोकरीची संधी

ग्रुप ‘सी’ सिव्हीलियनच्या एकूण ८९ पदांची भरती.

सुहास पाटील : suhassitaram@yahoo.com

डायरेक्टोरेट जनरल ऑफ आर्म्ड् फोर्सेस मेडिकल र्सिव्हसेस ((DGAFMS)), नवी दिल्ली. (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) ((Advt. No. ३३०८२/DR/DGAFMS/DG-sB) DGAFMS) DGAFMS च्या विविध डेपोमध्ये ग्रुप ‘सी’ सिव्हीलियनच्या एकूण ८९ पदांची भरती.

DGAFMS च्या युनिटनुसार रिक्त पदांचा तपशिल –

(क) आर्म्ड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, (AFMC)), पुणे – ४११ ०४० –

(II) आर्म्ड् फोर्सेस मेडिकल स्टोअर डेपो (AFMSD), आकुर्ली रोड नं. ३, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४०० १०१ –

(III) आर्म्ड् फोर्सेस मेडिकल स्टोअर डेपो (AFMSD), डॉ. कोयाजी रोड,

पुणे – ४११ ००१ –

(IV) र्आिटफिशियल लिम्ब सेंटर (ALC),

पुणे – ४११ ००१ –

(१) मल्टि टास्कींग स्टाफ (mts) (चौकीदार/सफाईवाला/मेसेंजर/माळी) – AFMC) पुणे (सफाईवाला – ४ पदे (इमाव – १, खुला – ३); चौकीदार – १० पदे (अजा – ३, खुला – ७); माळी – १ पदे (खुला)).

AFMSD, मुंबई – १ पद (सफाईवाला) (खुला)). AFMSD, पुणे – ८ पदे (चौकीदार – ७ (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ४); सफाईवाला – १ (अजा)). ALC, पुणे – २ पदे (मेसेंजर – १ (खुला); माळी – १ (खुला)).

पात्रता – १० वी उत्तीर्ण. वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.

(२) कुक, बार्बर, कँटिन बेअरर, वॉशरमन – AFMC) पुणे – बार्बर – २ (खुला), वॉशरमन – १ (इमाव).

AFMSD, पुणे – कुक – १ पद (खुला).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील कौशल्य.

(३) ट्रेड्समन मेट – AFMC), पुणे – ७ पदे (इमाव – २, खुला – ५).

AFMSD, कांदिवली, मुंबई – ११ पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, खुला – ६).

AFMSD, पुणे – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – ३, ईडब्ल्यूएस् – १).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शारीरिक क्षमता चाचणी – ४० कि.ग्रॅ. वजन उचलून १०० मीटर अंतर ६० सेकंदांत पार करणे व ४० कि.ग्रॅ. वजन उचलून ३० सेकंद स्थिर राहणे.

(४) फायरमन –  AFMSD, पुणे – २ पदे (अजा – १, अज – १) .

पात्रता – (i) १० वी उत्तीर्ण, (ii) शारीरिक मापदंड – उंची – १६५ सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ., छाती – ८१.५ सें.मी. ते ८५ सें.मी., (iii) शारीरिक क्षमता चाचणी – ६३.५ कि.ग्रॅ. वजनाचा माणूस उचलून १८३ मीटर अंतर ९६ सेकंदांत पार करणे; २.७ मीटरचा खंदक लांब उडी मारून (दोन्ही पायांवर उतरणे) पार करणे; हाता/पायाचा वापर करून ३ मीटर उंच दोर चढणे; (i५) टेक्निकल – फायर फार्यंटग कोर्स.

इष्ट पात्रता – (i) हलके वाहन चालविण्याचा परवाना, (ii) फायरमन कामाचा अनुभव, (iii) फायर फार्यंटग कोर्स (गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त संस्थेकडील).

(५) सिनेमा प्रोजेक्टनिस्ट ग्रेड- II – AFMC, पुणे – १ पद (इमाव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित कामातील कौशल्य.

(६) हायली स्किल्ड् एक्स-रे इलेक्ट्रिशियन – AFMSD, पुणे – १ पद (खुला).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा. इष्ट पात्रता – ३ वर्षांचा अनुभव.

(७) स्टोअर कीपर – AFMSD, कांदिवली, मुंबई – ७ पदे (अजा – २, अज – १, इमाव – २, खुला – २) (१ पद दिव्यांग ओएच कॅटेगरीसाठी राखीव).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि टार्यंपग स्पीड इंग्लिश – ३० श.प्र.मि. किंवा  हिंदी २५ श.प्र.मि.ल इष्ट पात्रता – मेडिकल स्टोअरमधील कामाचा अनुभव.

(८) स्टेनोग्राफर ग्रेड- II – AFMC  पुणे – १ पद (इमाव).

पात्रता – (i) १२ वी उत्तीर्ण आणि (ii) स्किल टेस्ट – स्टेनोग्राफी डिक्टेशन १० मिनिटांचे ८० श.प्र.मि. ट्रान्सक्रिप्शन – इंग्लिश ५० मिनिटे, हिंदी ६५ मिनिटे (कॉम्प्युटरवर).

वयोमर्यादा – पद क्र. १ ते ६ साठी १८ ते २५ वर्षे. पद क्र. ७ ते ८साठी १८ ते २७ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

वेतन –

पद क्र. १ ते ३ साठी पे-लेव्हल – १, अंदाजे वेतन रु. २९,०००/-;

पद क्र. ४, ५, ७ साठी पे-लेव्हल – २, अंदाजे वेतन रु. ३१,०००/-;

पद क्र. ६ व ८ साठी पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन रु. ४१,०००/-.

अर्जाचा विहीत नमुना भारतीय लष्कराचे संके तस्थळ  www.indianarmy.nic.in  वरून डाऊनलोड करता येईल.

विहीत नमुन्यातील अर्ज आणि अ‍ॅडमिट कार्ड उमेदवारांनी स्वत:च्या हाताने भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित युनिटला The Commandant/Commanding Officer यांना वर दिलेल्या पत्त्यावर रजिस्टर्ड/साध्या पोस्टाने दि. ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Job opportunity ministry of defence government of india akp

Next Story
शिक्षकांची बदलती भूमिका
ताज्या बातम्या