नोकरीची संधी

एकूण रिक्त पदे – ४९.

||सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) (संरक्षण मंत्रालयांतर्गत नवरत्न कंपनी) (Advt. No  ०१ / २०२१-२२, dt. २१.७.२०२१) BEL हैद्राबाद युनिटसाठी प्रोजेक्ट इंजिनीअर पदांची करार पद्धतीने भरती.

एकूण रिक्त पदे – ४९. सुरुवातीला उमेदवार २ वर्षांच्या कराराने नियुक्त केले जातील. त्यानंतर करार आणखी २ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.

(१) प्रोजेक्ट इंजिनीअर-क (इलेक्ट्रॉनिक्स) – ३६ पदे.

(२) प्रोजेक्ट इंजिनीअर-क (मेकॅनिकल) – ८ पदे.

(३) प्रोजेक्ट इंजिनीअर-क (कॉम्प्युटर सायन्स) – ४ पदे.

(४) प्रोजेक्ट ऑफिसर-क (ह्युमन रिसोर्सेस) – १ पद (खुला).

प्रोजेक्ट इंजिनीअर-क  पदांसाठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्गासह उत्तीर्ण. (अजा / अज / दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट नाही.)

प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी पात्रता – एमबीए / एमएसडब्ल्यू / एमएचआरएम / एमए (ह्युमन रिसोर्सेस स्पेशलायझेशनसह) प्रथम वर्गासह उत्तीर्ण. (अजा / अज / दिव्यांग – गुणांची अट नाही.)

अनुभव – प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी किमान २ वर्षांचा इंडस्ट्रीमधील कामाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी २८ वर्षेपर्यंत. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा / अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० / १३ / १५ वर्षे.

एकत्रित मानधन – सर्व पदांसाठी दरमहा एकत्रित वेतन रु. ३५,००० / – १ वर्षानंतर पुढील ३ वर्षांसाठी प्रत्येक वर्षी रु. ५,००० / – ची वाढ दिली जाईल. शिवाय इतर खर्चासाठी दरवर्षी रु. १०,००० / – दिले जातील.

सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज www.bel-india.i या संकेतस्थळावर दि. ४ ऑगस्ट २०२१ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ((Careers > Recruitment > Advertisement Link)

किंवा  https: /  / register.cbtexams.in / BEL / HyderabadUnit / /  या URL ला लॉगइन करा.

अर्जाचे शुल्क – सर्व पदांसाठी रु. ५०० / -. (अजा / अज  / दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.)

निवड पद्धती – रिक्त पदांच्या १: ५ प्रमाणात पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. सर्व पदांसाठी शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची निवड पुढील प्रकारे पदवी परीक्षेतील गुण (७५% वेटेज) अनुभव (१०% वेटेज) आणि मुलाखत (१५% वेटेज) मधील गुणांना वेटेज देऊन केली जाईल.

शंकासमाधानासाठी   hydhrgen@bel.co.in या ई-मेलवर संपर्क साधावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Job opportunity project engineer for hyderabad unit ssh