सुहास पाटील : suhassitaram@yahoo.com
* नवोदय विद्यालय समितीअंतर्गत मुख्यालय व देशभरातील ६४९ जवाहर नवोदय विद्यालये आणि रिजनल ऑफिससेसमध्ये पुढील १,९२५ पदांची भरती. मुख्यत्वे करून भरती करावयाची रिक्त पदे नॉर्थ ईस्ट रिजन व हार्ड स्टेशन्समधील आहेत.




रिक्त पदांचा तपशील –
(१) मल्टि टास्किंग स्टाफ (ग्रुप-सी) मुख्यालय / रिजनल ऑफिस कॅडर (पोस्ट कोड – १६) – २३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४) (१ पद दिव्यांग ओएच कॅटेगरीसाठी राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण.
(२) मेस हेल्पर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १५) – ६२९ पदे (अजा – ९४, अज – ४७, इमाव – १६९, ईडब्ल्यूएस – ६२, खुला – २५७) (२६ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – ६, व्हीएच – ८, एचएच – ६, इतर – ६ पदे राखीव).
पात्रता – (i) १० वी उत्तीर्ण (JNVs मेसमधील कॅज्युअल वर्कर्सना जॉइन झाल्यापासून दोन वर्षांच्या आत १० वी उत्तीर्ण करणे अनिवार्य.)
(ii) शासकीय निवासी संस्थेमधील १० वर्षांचा अनुभव.
( iii) NVS ने विहित केलेली स्किल टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल.
(३) लॅब अटेंडंट (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १४) – १४२ पदे
(अजा – २१, अज – १०, इमाव – ३८, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ५९) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – १, व्हीएच – १, एचएच – २, इतर – १ पदे राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि लॅबोरेटरी टेक्निकमधील डिप्लोमा किंवा १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.
(४) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १३) – २७३ पदे
(अजा – ४०, अज – २०, इमाव – ७३, ईडब्ल्यूएस – २७, खुला – ११३) (११ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – ४, व्हीएच – ४, इतर – ३ पदे राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन / प्लंबर ट्रेडमधील आयटीआय कोर्स आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, वायिरग आणि प्लंबिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(५) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (ग्रुप-सी)
(JNV Cadre) (पोस्ट कोड – १२) – ६२२ पदे (अजा – ९३, अज – ४६, इमाव – १६७, ईडब्ल्यूएस – ६२, खुला – २५४) (२५ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – ७, व्हीएच – ६, एचएच – ६, इतर – ६ पदे राखीव).
(६) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (ग्रुप-सी) (मुख्यालय / रिजनल ऑफिस कॅडर) (पोस्ट कोड – ११) – ८ पदे (अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता – पद क्र. ५ व ६ साठी १२ वी उत्तीर्ण आणि टायिपग स्पीड इंग्लिश – ३० श.प्र.मि. किंवा हिंदूी – २५ श.प्र.मि. किंवा CBSE बोर्डाची १२ वी (सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि ऑफिस मॅनेजमेंट व्होकेशनल विषयांसह उत्तीर्ण).
इष्ट पात्रता – १० वी किंवा १२ वीला कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषय अभ्यासलेला असावा किंवा कॉम्प्युटर्समधील ६ महिन्यांचा डिप्लोमा कोर्स.
(७) कॅटिरग असिस्टंट (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १०) – ८७ पदे (अजा – १३, अज – ६, इमाव – २३, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३७) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी ओएच / व्हीएच / एचएच / इतरसाठी प्रत्येकी १ पद राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि मिनिस्ट्री ऑफ टूरिझम केंद्र / राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडील ३ वर्षे कालावधीचा कॅटिरग डिप्लोमा.
किंवा सीबीईसी बोर्डाची १२ वी हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग या व्होकेशनल विषयासह उत्तीर्ण आणि कॅटिरगमधील १ वर्षांचा अनुभव.
किंवा १२ वी उत्तीर्ण आणि १ वर्ष कालावधीचा कॅटिरग डिप्लोमा.
(८) कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०९) – ४ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि १ वर्ष कालावधीचा केंद्र / राज्य सरकारकडील मान्यताप्राप्त संस्थेकडील कॉम्प्युटर डिप्लोमा.
(९) स्टेनोग्राफर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०८) – २२ पदे (अजा – ३, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड ८० श.प्र.मि. व टायिपग स्पीड ४० श.प्र.मि. किंवा हिंदूी शॉर्टहँड स्पीड ६० श.प्र.मि. व टायिपग स्पीड ३० श.प्र.मि.
(१०) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल) (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०७) – १ पद (खुला).
पात्रता – सिव्हिल इंजिनीअिरग पदवी / पदविका आणि ३ वर्षांचा अनुभव.
(११) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप-बी) (पोस्ट कोड – ०६) – ४ पदे (इमाव – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओएचसाठी राखीव).
पात्रता – पदव्युत्तर पदवी कोणत्याही विषयातील (पदवी स्तरावर हिंदूी आणि इंग्लिश विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदूी / इंग्लिश माध्यम असावा.) आणि हिंदूीमधून इंग्लिश आणि इंग्लिशमधून हिंदूी ट्रान्सलेशन डिप्लोमा.
(१२) ऑडिट असिस्टंट (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०५) – ११ पदे (अजा – ५, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).
पात्रता – बी.कॉम. उत्तीर्ण.
इष्ट पात्रता – शासकीय / निमशासकीय / ऑटोनॉमस संस्थेमधील अकाउंट्स कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(१३) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०४) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओएचसाठी राखीव).
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
इष्ट पात्रता – अॅडमिनिस्ट्रेटिव्ह, फिनान्शियल मॅटर्समधील केंद्र सरकार / राज्य सरकार / केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेतील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
(१४) फीमेल स्टाफ नर्स (ग्रुप-बी) (पोस्ट कोड – ०३) – ८२ पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३५) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी ओएच – २, व्हीएच – १, इतर – १ साठी राखीव).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि ३ वर्ष कालावधी नर्सिग डिप्लोमा ग्रेड ‘ए’सह उत्तीर्ण किंवा बी.एससी. (नर्सिग) आणि हॉस्पिटल / क्लिनिकमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१५) असिस्टंट कमिशनर (अॅडमिन) (ग्रुप-ए) (पोस्ट कोड – ०२) – २ पदे (खुला).
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ७ वरील कामाचा ४ वर्षांचा अनुभव.
(१६) असिस्टंट कमिशनर (ग्रुप-ए) (पोस्ट कोड – ०१) – ५ पदे (अज – १, इमाव – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओएचसाठी राखीव).
पात्रता – ह्युमॅनिटीज / सायन्स / कॉमर्समधील पदव्युत्तर पदवी आणि वेतन श्रेणी पे-लेव्हल – १० वरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा –
पद क्र. १ ते ३, ८, १२, १३ साठी ३० वर्षे; पद क्र. ५, ६ व ९ साठी २७ वर्षे; पद क्र. ४ साठी ४० वर्षे;
पद क्र. ७, १० व १४ साठी ३५ वर्षे; पद क्र. ११ साठी ३२ वर्षे; पद क्र. १५ व १६ साठी ४५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे; अजा / अज – ५ वर्षे; दिव्यांग – १० / १३ / १५ वर्षे)
दरमहा वेतन –
पद क्र. १ ते ३ साठी पे-लेव्हल – १ वर अंदाजे वेतन रु. २९,००० / -; पद क्र. ४ ते ६ साठी पे-लेव्हल – २ अंदाजे वेतन रु. ३२,००० / -;
पद क्र. ७ ते ९ साठी पे-लेव्हल – ४ अंदाजे वेतन रु. ४३,००० / -; पद क्र. १० साठी पे-लेव्हल – ५;
पद क्र. ११ ते १३ साठी पे-लेव्हल – ६ रु. ५९,००० / -; पद क्र. १४ साठी पे-लेव्हल – ७ रु. ६५,०००/-;
पद क्र. १५ साठी पे-लेव्हल – १० रु. ९८,००० / -; पद क्र. १६ साठी पे-लेव्हल – ११ रु. १,१४,००० / -.
निवड पद्धती – पद क्र. १, ३, ७, ८, ११ ते १४ साठी कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट; पद क्र. २, ४ ते ६ व ९ साठी कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट आणि स्किल टेस्ट जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल; पद क्र. १०, १५ व १६ साठी संगणकाधारित चाचणी आणि मुलाखत ( CBT मध्ये चुकीच्या उत्तरांसाठी १ / ४ गुण वजा केले जातील.)
CBT दि. ९ मार्च ते ११ मार्च २०२२ दरम्यान घेतली जाईल.
परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, इ.
पात्रता, वयोमर्यादेसाठी कट ऑफ डेट आहे १० फेब्रुवारी २०२२.
प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल.
JNV च्या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यांप्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. इमावसाठी Annexure- II, अजा / अजसाठी Annexure- III, ईडब्ल्यूएससाठी Annexure- IV.
अर्जाचे शुल्क – पद क्र. १ ते ३ साठी रु. ७५० / -; पद क्र. ४ ते १३ (फीमेल स्टाफ नर्स) साठी
रु. १,००० / -; पद क्र. १४ साठी रु. १,२०० / -; पद क्र. १५ व १६ साठी रु. १,५०० / -. ऑनलाइन अर्ज www. navodaya. gov. in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत करावेत.