सुहास पाटील : suhassitaram@yahoo.com

* नवोदय विद्यालय समितीअंतर्गत मुख्यालय व देशभरातील ६४९ जवाहर नवोदय विद्यालये आणि रिजनल ऑफिससेसमध्ये पुढील १,९२५ पदांची भरती. मुख्यत्वे करून भरती करावयाची रिक्त पदे नॉर्थ ईस्ट रिजन व हार्ड स्टेशन्समधील आहेत.

20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

रिक्त पदांचा तपशील –

(१) मल्टि टास्किंग स्टाफ (ग्रुप-सी) मुख्यालय / रिजनल ऑफिस कॅडर (पोस्ट कोड – १६) – २३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४) (१ पद दिव्यांग ओएच कॅटेगरीसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

(२) मेस हेल्पर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १५) – ६२९ पदे (अजा – ९४, अज – ४७, इमाव – १६९, ईडब्ल्यूएस – ६२, खुला – २५७) (२६ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – ६, व्हीएच – ८, एचएच – ६, इतर – ६ पदे राखीव).

पात्रता – (i) १० वी उत्तीर्ण (JNVs मेसमधील कॅज्युअल वर्कर्सना जॉइन झाल्यापासून दोन वर्षांच्या आत १० वी उत्तीर्ण करणे अनिवार्य.)

(ii) शासकीय निवासी संस्थेमधील १० वर्षांचा अनुभव.

( iii)  NVS ने विहित केलेली स्किल टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल.

(३) लॅब अटेंडंट (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १४) – १४२ पदे

(अजा – २१, अज – १०, इमाव – ३८, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ५९) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – १, व्हीएच – १, एचएच – २, इतर – १ पदे राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि लॅबोरेटरी टेक्निकमधील डिप्लोमा किंवा १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.

(४) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १३) – २७३ पदे

(अजा – ४०, अज – २०, इमाव – ७३, ईडब्ल्यूएस – २७, खुला – ११३) (११ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – ४, व्हीएच – ४, इतर – ३ पदे राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन / प्लंबर ट्रेडमधील आयटीआय कोर्स आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, वायिरग आणि प्लंबिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(५) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (ग्रुप-सी)

(JNV Cadre) (पोस्ट कोड – १२) – ६२२ पदे (अजा – ९३, अज – ४६, इमाव – १६७, ईडब्ल्यूएस – ६२, खुला – २५४) (२५ पदे दिव्यांग कॅटेगरी – ओएच – ७, व्हीएच – ६, एचएच – ६, इतर – ६ पदे राखीव).

(६) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (ग्रुप-सी) (मुख्यालय / रिजनल ऑफिस कॅडर) (पोस्ट कोड – ११) – ८ पदे (अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

पात्रता – पद क्र. ५ व ६ साठी १२ वी उत्तीर्ण आणि टायिपग स्पीड इंग्लिश – ३० श.प्र.मि. किंवा हिंदूी – २५ श.प्र.मि. किंवा  CBSE बोर्डाची १२ वी (सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि ऑफिस मॅनेजमेंट व्होकेशनल विषयांसह उत्तीर्ण).

इष्ट पात्रता – १० वी किंवा १२ वीला कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषय अभ्यासलेला असावा किंवा कॉम्प्युटर्समधील ६ महिन्यांचा डिप्लोमा कोर्स.

(७) कॅटिरग असिस्टंट (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – १०) – ८७ पदे (अजा – १३, अज – ६, इमाव – २३, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३७) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी ओएच / व्हीएच / एचएच / इतरसाठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि मिनिस्ट्री ऑफ टूरिझम केंद्र / राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडील ३ वर्षे कालावधीचा कॅटिरग डिप्लोमा.

किंवा सीबीईसी बोर्डाची १२ वी हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग या व्होकेशनल विषयासह उत्तीर्ण आणि कॅटिरगमधील १ वर्षांचा अनुभव.

किंवा १२ वी उत्तीर्ण आणि १ वर्ष कालावधीचा कॅटिरग डिप्लोमा.

(८) कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०९) – ४ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि १ वर्ष कालावधीचा केंद्र / राज्य सरकारकडील मान्यताप्राप्त संस्थेकडील कॉम्प्युटर डिप्लोमा.

(९) स्टेनोग्राफर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०८) – २२ पदे (अजा – ३, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड ८० श.प्र.मि. व टायिपग स्पीड ४० श.प्र.मि. किंवा हिंदूी शॉर्टहँड स्पीड ६० श.प्र.मि. व टायिपग स्पीड ३० श.प्र.मि.

(१०) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल) (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०७) – १ पद (खुला).

पात्रता – सिव्हिल इंजिनीअिरग पदवी / पदविका आणि ३ वर्षांचा अनुभव.

(११) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप-बी) (पोस्ट कोड – ०६) – ४ पदे (इमाव – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओएचसाठी राखीव).

पात्रता – पदव्युत्तर पदवी कोणत्याही विषयातील (पदवी स्तरावर हिंदूी आणि इंग्लिश विषय अभ्यासलेले असावेत किंवा हिंदूी /  इंग्लिश माध्यम असावा.) आणि हिंदूीमधून इंग्लिश आणि इंग्लिशमधून हिंदूी ट्रान्सलेशन डिप्लोमा.

(१२) ऑडिट असिस्टंट (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०५) – ११ पदे (अजा – ५, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता – बी.कॉम. उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – शासकीय / निमशासकीय / ऑटोनॉमस संस्थेमधील अकाउंट्स कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

(१३) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-सी) (पोस्ट कोड – ०४) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओएचसाठी राखीव).

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.

इष्ट पात्रता – अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह, फिनान्शियल मॅटर्समधील केंद्र सरकार / राज्य सरकार / केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेतील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

(१४) फीमेल स्टाफ नर्स (ग्रुप-बी) (पोस्ट कोड – ०३) – ८२ पदे (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३५) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी ओएच – २, व्हीएच – १, इतर – १ साठी राखीव).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि ३ वर्ष कालावधी नर्सिग डिप्लोमा ग्रेड ‘ए’सह उत्तीर्ण किंवा बी.एससी. (नर्सिग) आणि हॉस्पिटल /  क्लिनिकमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(१५) असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-ए) (पोस्ट कोड – ०२) – २ पदे (खुला).

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ७ वरील कामाचा ४ वर्षांचा अनुभव.

(१६) असिस्टंट कमिशनर (ग्रुप-ए) (पोस्ट कोड – ०१) – ५ पदे (अज – १, इमाव – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ओएचसाठी राखीव).

पात्रता – ह्युमॅनिटीज / सायन्स / कॉमर्समधील पदव्युत्तर पदवी आणि वेतन श्रेणी पे-लेव्हल – १० वरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा –

पद क्र. १ ते ३, ८, १२, १३ साठी ३० वर्षे; पद क्र. ५, ६ व ९ साठी २७ वर्षे; पद क्र. ४ साठी ४० वर्षे;

पद क्र. ७, १० व १४ साठी ३५ वर्षे; पद क्र. ११ साठी ३२ वर्षे; पद क्र. १५ व १६ साठी ४५ वर्षे. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे; अजा / अज – ५ वर्षे; दिव्यांग – १० / १३ / १५ वर्षे)

दरमहा वेतन –

पद क्र. १ ते ३ साठी पे-लेव्हल – १ वर अंदाजे वेतन रु. २९,००० / -; पद क्र. ४ ते ६ साठी पे-लेव्हल – २ अंदाजे वेतन रु. ३२,००० / -;

पद क्र. ७ ते ९ साठी पे-लेव्हल – ४ अंदाजे वेतन रु. ४३,००० / -; पद क्र. १० साठी पे-लेव्हल – ५;

पद क्र. ११ ते १३ साठी पे-लेव्हल – ६ रु. ५९,००० / -; पद क्र. १४ साठी पे-लेव्हल – ७ रु. ६५,०००/-;

पद क्र. १५ साठी पे-लेव्हल – १० रु. ९८,००० / -;  पद क्र. १६ साठी पे-लेव्हल – ११ रु. १,१४,००० / -.

निवड पद्धती – पद क्र. १, ३, ७, ८, ११ ते १४ साठी कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट; पद क्र. २, ४ ते ६ व ९ साठी कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट आणि स्किल टेस्ट जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल; पद क्र. १०, १५ व १६ साठी संगणकाधारित चाचणी आणि मुलाखत ( CBT मध्ये चुकीच्या उत्तरांसाठी १ / ४ गुण वजा केले जातील.)

 CBT दि. ९ मार्च ते ११ मार्च २०२२ दरम्यान घेतली जाईल.

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, इ.

पात्रता, वयोमर्यादेसाठी कट ऑफ डेट आहे १० फेब्रुवारी २०२२. 

प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल.

JNV च्या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यांप्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. इमावसाठी  Annexure- II, अजा / अजसाठी  Annexure- III, ईडब्ल्यूएससाठी  Annexure- IV.

अर्जाचे शुल्क – पद क्र. १ ते ३ साठी रु. ७५० / -; पद क्र. ४ ते १३ (फीमेल स्टाफ नर्स) साठी

रु. १,००० / -; पद क्र. १४ साठी रु. १,२०० / -; पद क्र. १५ व १६ साठी रु. १,५०० / -. ऑनलाइन अर्ज  www. navodaya. gov. in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत करावेत.