सरकरी नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना आता चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चने प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्टसह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. उमेदवार या पदांसाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट द्वारे अर्ज करू शकतात. तसेच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण ७ रिक्त पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही १७ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली असून ३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे उमेदवार अर्ज करू शकतील.

रिक्त पदांचा तपशील

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट IV (रिसर्च असिस्टंट) – १ पद

वरिष्ठ प्रकल्प संशोधन फेलो (एसआरएफ) – १ पद

प्रकल्प प्रशासकीय सहाय्य -III (प्रकल्प सहाय्यक) -१ पद

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – II (प्रोजेक्ट टेक्निशियन – II) – २ पदे

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट -I (प्रोजेक्ट टेक्निशियन I) -१ पद

प्रकल्प प्रशासकीय सहाय्य –IV (MTS) – १ पद

शैक्षणिक पात्रता

संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- II या पदासाठी उमेदवार हा १२ वी पास असणे अनिवार्य आहे. प्रोजेक्ट टेक्निशियन I पोस्टसाठी उमेदवाराने आयटीआय पदवीसह 10 वी उत्तीर्ण झालेले असावे.

वयोमर्यादा

वरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. उमेदवार या भरतीशी संबंधित असलेल्या अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना http://www.nimr.org.in या अधिकृत वेबसाइटद्वारे पाहू शकतात.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख – १७ सप्टेंबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२१

अधिकृत वेबसाईट – http://www.nimr.org.in