वीज खात्यात नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MSPGCL भर्ती 2021) ने इंजीनियर आणि केमिस्ट पदांसाठी अर्ज जारी केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी अधिकृत वेबसाइट http://www.mahagenco.in द्वारे अर्ज करू शकतात. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी या पदांसाठी केवळ नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज करावा. एकूण ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

रिक्त पदांचा तपशील

इंजीनियर – ११ पदे

UPSC CSE Result 2023 12 attempts 7 mains UPSC aspirant's 'no-selection' post has a message of hope
“आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष…”, UPSC परीक्षेत यश न मिळालेल्या उमेदवाराची पोस्ट तुफान व्हायरल, यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
A report by Michael Page India Salary Guidesuggests that an average salary increase of 20 percent is possible for senior executives in companies
उच्चाधिकाऱ्यांना चालू वर्षात २० टक्के वेतनवाढ शक्य; ‘मायकेल पेज इंडिया’चा अहवाल

केमिस्ट – २७ पदे

शैक्षणिक पात्रता

इंजीनियर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजीनियरची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
केमिस्ट पदांसाठी उमेदवारांकडे बीएससी केमिस्ट किंवा एमएससी केमिस्ट पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांचे वय २३ ऑक्टोबर २०२१ पासून मोजले जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज या पत्त्यावर पाठवा अर्ज

उमेदवारांनी त्यांचा अर्ज सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई 400019 वर पाठवायचा आहे.

या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा

अर्ज सुरू करण्याची तारीख – २३ सप्टेंबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०२१

अधिकृत वेबसाईट – http://www.mahagenco.in