आयुर्विमा महामंडळांतर्गत आयुर्विमा सुवर्णजयंती फाऊंडेशनद्वारा आर्थिकदृष्टय़ा मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या २० असून त्यापैकी १० शिष्यवृत्ती मुलग्यांसाठी तर १० शिष्यवृत्ती मुलींसाठी उपलब्ध आहेत.
* वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी तसेच इतर पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम :
आवश्यक पात्रता- अर्जदारांनी २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात बारावीची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक नसावे.
* औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अथवा सरकारमान्य संस्थांमधील रोजगारप्रवण
अभ्यासक्रम :
आवश्यक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात दहावीची शालान्त परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक नसावे.
अधिक माहिती- शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली आयुर्विमा महामंडळाची जाहिरात पाहावी तसेच महामंडळाचे नजीकचे विभागीय कार्यालय अथवा शाखेला भेट द्यावी अथवा एलआयसीच्या http://www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.