scorecardresearch

Job Alert 2021: महाराष्ट्र विद्युत विभागातील विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या तपशील

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

MAHAGENCO Recruitment 2021
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट http://www.mahagenco.in द्वारे अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण ३८ रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की त्यांना या पदांसाठी नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज करावा लागेल.

रिक्त पदांची संख्या

अभियंता – ११ पदे
केमिस्ट – २७ पदे

शैक्षणिक पात्रता

अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तर केमिस्ट पदांसाठी उमेदवाराकडे बीएससी रसायनशास्त्र किंवा एमएससी रसायनशास्त्र पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांचे वय २३ ऑक्टोबर २०२१ पासून मोजले जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज या पत्त्यावर करणे आवश्यक आहे

उमेदवार त्यांचे अर्ज सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई ४०००१९ वर पाठवू शकतात.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख – २३ सप्टेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०२१
अधिकृत वेबसाईट – http://www.mahagenco.in

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2021 at 09:55 IST

संबंधित बातम्या