एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

वन सेवा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा या तज्ज्ञ सेवांमधील राजपत्रित पदांवर निवडीसाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेची योजना व पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम याबाबत आयोगाकडून जून २०२१मध्ये घोषणा करण्यात आली आहे. या लेखामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाच्या आधारे अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल कोणते आहेत याबाबत चर्चा करण्यात येत आहे. 

10th exam maharashtra
राज्यात दहावीची परीक्षा सुरू, पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे किती?
Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
The state board will also test the open book examination system
ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education 10th exam from tomorrow pune
राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, १६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

संयुक्त पूर्वपरीक्षा परीक्षा योजना अभ्यासक्रम

तिन्ही तांत्रिक सेवांच्या पूर्वीच्या  आणि आताच्या पूर्वपरीक्षा अभ्यासक्रमाची तुलना केली तर पुढील बाबी लक्षात येतात : 3 तिन्ही सेवांच्या पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन विषयातील भारतीय अर्थव्यवस्था/ आर्थिक सामाजिक विकास आणि इतिहास हे घटक वगळण्यात आले आहेत.

– चालू घडामोडी हा घटक आधीप्रमाणेच समाविष्ट असला तरी वनसेवेमध्ये सामान्य अध्ययनाचा निम्मा भाग या घटकाने व्यापला होता ते प्रमाण कमी होणार आहे.

– मराठी व इंग्रजी भाषा घटक तिन्ही परीक्षांमध्ये समाविष्ट होते. मराठीसाठी बारावी तर इंग्रजीसाठी पदवीचा स्तरही आधीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. केवळ कृषी सेवेसाठी आधी मराठीच भाषेचा स्तर शालांत परीक्षेइतका होता तो आता बारावीप्रमाणे असेल.

– २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्न संख्या बदलली नसली तरी कोणत्या घटकासाठी किती प्रश्न हे पूर्वीप्रमाणे नमूद केलेले नाही. त्यामुळे पहिली परीक्षा झाल्यावरच प्रत्येक घटकाचे ६ी्रॠँ३ंॠी लक्षात येणार आहे.

– तिन्ही सेवांसाठीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयांसाठी आधी प्रत्येकी २५, १५ आणि १० अशी प्रश्नसंख्या होती. आता ती १०-१० अशी होण्याची शक्यता असली तरी जास्तीत जास्त २५ प्रश्न येऊ शकतील असे गृहीत धरून सध्या तयारी करायला हवी.

– सामान्य अध्ययन हा घटक आधीच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट होता असे दिसत असले तरी सविस्तर अभ्यासक्रमाचे विश्लेषण केल्यावर त्यातील घटक विषय वेगवेगळे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आधीच्या आणि आताच्या अभ्यासक्रमाची तुलना करणे तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

तिन्ही सेवांसाठीच्या आधीच्या आणि आताच्या अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल पुढीलप्रमाणे पाहता येतील:

  • वन सेवा परीक्षा अभ्यासक्रमातील बदल

– पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन घटकामध्ये प्रत्येकी २५-२५ गुणांचे प्रश्न चालू घडामोडी आणि सामान्य बौद्धिक क्षमतेसाठी विचारण्यात येत असत. आता सामान्य अध्ययनामध्ये राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण हे नवीन घटक विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.

– मात्र मुख्य परीक्षेसाठी यातील भूगोल, राज्यव्यवस्था आणि पर्यावरण या घटकांचा अभ्यास केला जातच होता. त्यामुळे हे अगदीच नवीन विषय नाहीत.

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, दूर संवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण आणि ॅकर व त्याचे उपयोजन  आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञान हे नवीन मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत.

  •   कृषी सेवा परीक्षा अभ्यासक्रमातील बदल

– पूर्वपरीक्षेमध्ये सर्वाधिक मदतगार ठरणारा २५ प्रश्नांचा (५० गुण) कृषी घटक वगळण्यात आला आहे. सामान्य अध्ययनातील अर्थव्यवस्था. इतिहास घटकांबरोबरच महाराष्ट्राचे समाजसुधारक, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास घटकातील काही मुद्दे वगळण्यात आले आहेत.

– सामान्य विज्ञान घटकातील माहिती व दळणवळण तंत्रज्ञान हा मुद्दा आधीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होताच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, दूर संवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण आणि ॅकर व त्याचे उपयोजन हे नवीन मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेल आहेत.

– सामान्य बौद्धिक क्षमता हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

  • अभियांत्रिकी सेवा परीक्षा अभ्यासक्रमातील बदल

-पूर्वपरीक्षेमध्ये अभियांत्रिकी अभियोग्यता हा ६० प्रश्नांचा (६० गुण) घटक वगळण्यात आला आहे.

– सामान्य बौद्धिक क्षमता हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

– इतिहास आणि अर्थव्यवस्था हे घटक वगळण्यात आले आहेत.