Maharashtra SSC Board Exam 2022: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज

परीक्षा नोंदणीबद्दल राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून माहिती दिली. २०२२ साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे.

10th exam
दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू (फाइल फोटो इंडियन एक्सप्रेस)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड एसएससी किंवा इयत्ता दहावी परीक्षा २०२२ (Maharashtra Board SSC Exam 2022) साठी नोंदणी सुरू केली आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड दहावी परीक्षा २०२२ साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे.

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे अर्ज १८ नोव्हेंबरपासून mahahsscboard.in वर ऑनलाइन घेतले जातील.” महाराष्ट्र येस येस सी परीक्षा २०२२ बद्दल अधिक अद्यतने मिळविण्यासाठी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट तपासत रहा.

अशी करा नोंदणी

स्टेप १: MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटला https://mahahsscboard.in. भेट द्या.

स्टेप २: मुख्यपृष्ठावर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३ : अर्जात विचारलेली सर्व माहिती भरा.

स्टेप ४ : तुमची अर्ज फी सबमिट करा.

स्टेप ५ : अर्ज पूर्णपणे तपासल्यानंतर सबमिट करा आणि नंतर अर्ज कंफर्मेशन पेजची प्रिंट आउट घ्या.

यावर्षी, महाराष्ट्र बोर्डाने कोविड-१९ साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. मागील परीक्षांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी लक्षात घेऊन पर्यायी मूल्यमापन निकष वापरून निकाल तयार करण्यात आले. यंदा दहावीचे १५,७०,९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८३,२६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवले आहेत. यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९६ टक्के आहे. त्याच वेळी, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra ssc board exam 2022 registration for maharashtra boards 10th exam has started ttg

ताज्या बातम्या