राज्यात तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती पहोणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक पात्रता

महसूल विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

आणखी वाचा- CBSE 2023 Date Sheet: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

वयोमर्यादा

  • ओपन कॅटेगरी- १८ ते ३८ वर्ष
  • रिझर्व कॅटेगरी- १८ ते ४३ वर्ष
  • भूकंपग्रस्त उमेदवार- १८ ते ४५ वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • https://rfd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  • ‘लेटेस्ट न्युज’ या सेक्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर MAHA RFD/ Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti Notification 2023 या लिंकवर क्लिक करून डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
  • त्यातील प्रत्येक सूचना काळजीपुर्वक वाचा, जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही बाबतीत गैरसमज राहणार नाही.
  • सर्व सुचना वाचल्यानंतर जर तुम्ही या पदासाठी पात्र आहात याची खात्री करा आणि फॉर्मची प्रिंट घ्या.
  • त्यानंतर फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती भरा, पासपोर्ट साईज फोटो लावून नोटीफिकेशनमध्ये दिलेल्या पोस्टल ऍड्रेसवर शेवटच्या तारखेपुर्वी अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट पाठवा.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshtra talathi bharti 2023 know what is the age limit educational qualification required and how to apply pns
First published on: 09-01-2023 at 19:33 IST