Mazagon Dock Vacency 2022 : Recruitment for more than one thousand vacancies in MDL | Loksatta

Mazagon Dock Recruitment 2022 : MDLमध्ये एक हजारांहून अधिक रिक्त पदांवर होणार भरती; पगार असेल…

अर्ज नोंदणी लिंक सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी सक्रिय झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे.

Mazagon Dock Recruitment 2022 : MDLमध्ये एक हजारांहून अधिक रिक्त पदांवर होणार भरती; पगार असेल…
माझगाव डॉक भरती प्रक्रिया २०२२ साठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.

एमडीएल म्हणजेच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. याअंतर्गत एकूण १०४१ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. अर्ज नोंदणी लिंक सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी सक्रिय झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा, कारण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवण्याची कोणतीही मागणी कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. माझगाव डॉक भरती प्रक्रिया २०२२ साठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया :

 • वयोमर्यादा: अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावे. तर, कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे.
 • निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, व्यापार चाचणी (ट्रेड टेस्ट) आणि अनुभव पडताळणी.
 • अर्ज फी: सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून शंभर रुपये भरावे लागतील. तथापि, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांच्या उमेदवारांना प्रक्रिया शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

 • सर्वप्रथम, इच्छुक आणि पात्र उमेदवार एमडीएलची वेबसाइट mazagondock.in ला भेट द्या.
 • मुख्यपृष्ठावर करिअर विभागात जा आणि भरती शोधा.
 • त्यानंतर नॉन-एक्झिक्युटिव्ह टॅबवर क्लिक करा.
 • यानंतर उमेदवारांनी संबंधित तपशील काळजीपूर्वक भरून स्वतःची नोंदणी करावी.
 • ई-मेलद्वारे पाठवलेल्या व्हेरिफिकेशन लिंकवर क्लिक करा. उमेदवाराने आपले नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
 • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्जातील सर्व तपशील भरा. आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज फी भरा.
 • फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.

वेतन संरचना :

 • विशेष श्रेणी (IDA-IX) – रु. २२,००० ते रु. ८३,१८०
 • विशेष श्रेणी (IDA-VIII) – रु २१,००० ते रु ७९,३८०
 • स्किल्ड ग्रेड-II (IDA-VI) – रु. १८,००० ते रु. ६८,१२०
 • स्किल्ड जीआर- I (IDA-VI) – रु. १७,००० ते रु. ६४,३६०
 • सेमी-स्किल्ड जीआर- III (IDA-IVA) – रु १६,००० ते रु ६०,५२०
 • सेमी-स्किल्ड ग्रेड- I (IDA-II) – रु. १३,२०० ते – रु. ४९,९१०

नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

पात्र उमेदवारांची यादी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तथापि, ऑनलाइन परीक्षेची तारीख ५ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केली जाऊ शकते. रिक्त पदांची संख्या सूचक आहे आणि संघटनात्मक गरजेनुसार वाढू किंवा कमी होऊ शकते. त्यामुळेच उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mazagondock.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला गेला आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
SBI Clerk Recruitment 2022: स्टेट बँकेत ५००० हुन अधिक पदांसाठी मोठी भरती; कुठे व कोण करू शकेल अर्ज पाहा

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच