मेकॅनिकल इंजिनीअिरगला कधीही मरण नाहीच. आता या शाखेच्या जवळ जाणाऱ्या काही शाखा उदयास आलेल्या आहेत. प्रोडक्शन इंजिनीअिरग आणि मेकेट्रॉनिक्स इंजिनीअिरग. मेकॅनिकलला अधिक वाव आहेच, पण प्रोडक्शन इंजिनीअिरगमध्येही चांगल्या नोकऱ्या आहेत. मेकेट्रॉनिक्सचं क्षेत्र, तर आताच उदयाला येत असल्यामुळे त्यातही भविष्यात भरपूर संधी असतील. मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये पदव्युत्तर पदवी (एम. ई. / एम.टेक.)घ्यायची असेल तर डिझाइन, अ‍ॅनालिसिस, मॅन्युफॅक्चिरग आणि एचव्हीएसी किंवा थर्मल या क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येतं. ‘डिझाइन’ म्हणजे एखादे उत्पादन कारखान्यात तयार करताना त्याचे विविध सुटे भाग कोणते, त्यांचा आकार किती असावा, ते एकमेकांशी कसे जोडले जातील, ते तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल वापरावा, वगरे विषयीचे तपशील तयार करणे म्हणजे डिझाइन. त्या उत्पादनावर कोणकोणती बले कार्यरत असतील, जसे ते वापरात असताना घासलं जाईल का? त्यावर दुसऱ्या एखाद्या भागाचा आघात होईल का, आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये ही बले तोलून धरताना त्या उत्पादनाच्या विविध ताकदी किती असतील? वगरेबाबत गणिती विश्लेषण करणे म्हणजे अ‍ॅनालिसिस! उत्पादन क्षेत्राशी निगडित विविध प्रक्रियांचा अभ्यास मॅन्युफॅक्चिरग या क्षेत्रात येतो, तर एचव्हीएसी म्हणजे ‘हिटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग’ ही थर्मल इंजिनीअिरग अर्थात औष्णिक ऊर्जेचे नियंत्रण करणारी शाखा आहे.

या क्षेत्रात स्वयंरोजगार, नोकरीच्या संधीही भरपूर आहेत. मोठय़ा कंपन्यांना त्यांची उत्पादने तयार करताना लागणारे सुटे भाग तयार करून पुरवणे, लहान आणि मध्यम कंपन्यांकडे त्यांचा स्वतचा देखभाल आणि दुरुस्ती विभाग नसतो. त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मदत करणारा स्वतचा उद्योग सुरू करता येऊ शकतो. याशिवाय मेकॅनिकल इंजिनीअिरगमधल्या अनेक उपशाखांमध्ये कन्सल्टन्सी अर्थात सल्लागारी करता येऊ शकते. कन्सल्टन्सी करताना तुम्हाला बऱ्याचदा भांडवलाची गरज नसते. त्यामुळे तो उत्तम बिनभांडवली किंवा कमी भांडवलातला उद्योग आहे. सध्या अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चिरग ही नवी उपशाखा मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये उदयाला आली आहे. यात ३-डी पिट्रिंग अर्थात त्रिमिती छपाईचं नवं तंत्रज्ञान आलं आहे. त्यामुळे या ३-डी पिट्रर्सचा वापर करता येऊ शकतो. या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करायला भरपूर वाव आहे. एखाद्या कारखान्याला इंडस्ट्रिअल लेआउट म्हणजेच यंत्रे कशी उभारावीत, उत्पादन प्रक्रियेच्या क्रमानुसार विविध यंत्रांचा कारखान्यातला क्रम आणि त्यांच्या जागा निश्चित करणे की, ज्याद्वारे कमीतकमी वेळात आणि कमीतकमी मनुष्यबळात ते उत्पादन कसे तयार करता येऊ शकेल, याचा सल्ला देता येऊ शकतो. विविध उपयोगांसाठी कोणता कच्चा माल वापरावा याचा सल्ला, यंत्रांच्या संरचनेबाबत मार्गदर्शन, असे अनेक स्वयंरोजगार इंजिनीअिरगच्या या शाखेत उपलब्ध आहेत. ज्यांना नोकरी करायची आहे, अशांसाठी वर्कशॉप प्लँट मॅनेजर, डिझाइन इंजिनीअर अशा नोकऱ्या असतात. डिझाइन इंजिनीअर म्हणून काम करतानाही प्रोडक्ट डिझाइन इंजिनीअर आणि प्रोसेस डिझाइन इंजिनीअर अशी पदे असतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे विविध प्रकारच्या कंपन्यांना विकण्यासाठी सेल्स इंजिनीअर्सची आवश्यकता असते. कारण या यंत्रांबाबतची तांत्रिक माहिती खरेदीदारांना देणे, त्यांच्या गरजा कोणत्या आहेत, हे जाणून ही यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना त्या मागणीनुसार यंत्रांमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करायला सांगणे, खरेदीदार कंपन्यांच्या गरजांनुसार त्यांना कोणती यंत्रे ही अधिक चांगली उपयोगी ठरू शकतात, याबाबतच्या पर्यायांविषयी मार्गदर्शन करून यंत्र विकणाऱ्या कंपनीच्या यंत्रांचा खप अधिकाधिक कसा वाढेल हे पाहणे, यासाठी नुसता सेल्समन कामाचा नाही, तर तो या विषयातला मेकॅनिकल इंजिनीअिरगचा तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. त्यामुळे सेल्स इंजिनीअरच्या नोकऱ्याही या क्षेत्रात उपलब्ध आहेत. मेकॅनिकल इंजिनीअिरगचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या आणि फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या फ्रेशर इंजिनीअरना त्यांच्या मेरिटनुसार आणि त्यांनी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात पूर्ण केलेल्या प्रकल्पांच्या आधारे ४ ते ८ लाखांपर्यंतचे पगाराचे वार्षकि पॅकेज मिळू शकते. मध्यम स्तरावरच्या इंजिनीअर्सना अर्थातच वार्षकि १२ ते १५ लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकते.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
pune,Giant Metrewave Radio Telescope, indigenous technology, research, 38 countries, scientists, narayangaon
पुणे : स्वदेशी ‘जीएमआरटी’चा ३८ देशातील शास्त्रज्ञांकडून वापर
Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास

मेकेट्रॉनिक्स इंजिनीअिरग

ही शाखा तुलनेनं अगदी नवीन आहे. यात मेकॅनिकल इंजिनीअिरग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग यांचा संगम केलेला आहे. कारण सध्या अनेक यंत्रे स्वयंचलित आणि संगणकाधारित असतात. त्यांची उभारणी, दुरुस्ती आणि देखभाल यासाठी स्वतंत्रपणे एक मेकॅनिकल आणि एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर अशा दोन इंजिनीअर्सची नियुक्ती करण्यापेक्षा कंपन्यांना या दोन्ही शाखांचं ज्ञान असलेल्या मेकेट्रॉनिक्स इंजिनीअरची नियुक्ती करणे जास्त सोयीचे होते.

प्रोडक्शन इंजिनीअिरग

या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष उत्पादन, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया आणि त्यांचे व्यवस्थापन यावर भर दिला जातो. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनीअिरगप्रमाणे यात थर्मल इंजिनीअिरगचा भाग कमी असतो. त्याऐवजी ऑपरेशन्स मॅनेजमेंटसारख्या विषयांना अधिक महत्त्व दिले जाते, ज्यात कारखान्यातल्या विविध उत्पादन प्रक्रियांना लागणारा वेळ आणि मनुष्यबळ हे कसे कमी करता येईल, उत्पादनाचा खर्च कसा कमी करता येईल, यावर जोर दिला जातो. एकाच कारखान्यात एकाच प्रकारच्या यंत्रांच्या संचाचा वापर करून विविध उत्पादने कशी तयार करता येतील, याचा अभ्यास केला जातो.

प्रा. मनोज अणावकर

anaokarm@yahoo.co.in