देशातील नामांकित फार्मसी मेडप्लस या कंपनीमध्ये पदभरती होणार आहे. यासाठीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. आय टी क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी असणार आहे.

पात्रता काय?

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसेच उमेदवारांना कोडिंगचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यास इच्छिणारे उमेदवार हे २०१९ ते २०२१ या बॅचमधील असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना data structures, Algorithms, Databases, Operating Systems या चार गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
C, Java किंवा Python च्या प्रोग्रामिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव – ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर

पद संख्या – ६० जागा

कसा करायचा अर्ज?

कंपनीकडे आलेल्या ऑनलाइन अप्लिकेशनची पाहणी केल्यानंतर काही उमेदवरांची टेस्टसाठी आणि मुलाखतींसाठी निवड करण्यात येणार आहे.

ही निवड ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करण्यात येणार आहे.

यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना टेस्टसाठी SMS किंवा ई-मेलद्वारे कळवण्यात येणार आहे.

https://itcareers.medplusindia.com/job-openings या वेबसाईटवर उमेदवारांना टेस्ट देता येणार आहे.

या टेस्टमधील मार्कांच्या भरवश्यावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासंबंधीचा मेसेज किंवा ई-मेल उमेदवारांना येणार आहे.