डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांतर्गत एम.फिल्. व पीएच.डी. करण्यासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
 उपलब्ध अधिछात्रवृत्तींचा तपशील : या योजनेंतर्गत २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रात उपलब्ध असणाऱ्या एकूण अधिछात्रवृत्तींची  संख्या १०१ असून यांपैकी ५० टक्के अधिछात्रवृत्ती अनुसूचित जातीतील महिला उमेदवारांसाठी तर तीन टक्के अधिछात्रवृत्ती अनुसूचित जातीतील अपंग उमेदवारांसाठी राखीव आहे.
योजनेंतर्गत समाविष्ट विषय : या योजनेत  मानव्यशास्त्र, सामाजिक विज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार अनुसूचित जातीचे आणि महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी असावेत. नमूद केल्यानुसार, विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.
अधिछात्रवृत्तीची रक्कम व तपशील : योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अधिछात्रवृत्ती व इतर लाभ देण्यात येतील-
* अधिछात्रवृत्ती : पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा १६ हजार रु. आणि उर्वरित कालावधीसाठी दरमहा १८ हजार रु.
* आकस्मिक खर्च : मानव्यशास्त्र व समाजविज्ञान विषयातील विद्यार्थ्यांसाठी पहिली दोन वर्षे
वार्षिक १० हजार रु. तर उर्वरित कालावधीसाठी वार्षिक २०,५०० रु. विज्ञान, अभियांत्रिकी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली दोन वर्षे वार्षिक १२ हजार रु. तर उर्वरित कालावधीसाठी वार्षिक २५ हजार रु.
* विशेष साहाय्य : वार्षिक तीन हजार रु.
* अंध विद्यार्थ्यांना साहाय्यक निधी : दरमहा
दोन हजार रु.
* घरभाडे भत्ता : शासकीय नियमांनुसार.
अधिक माहिती : योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘बार्टी’ची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या https://barti.maharashtra.gov.in (click on NOTICE BOARD > BANRF – 2014  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख: संपूर्णपणे भरलेले अर्ज महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),
२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे- ४११००१ या पत्त्यावर  २९ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.