फारुक नाईकवाडे

‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. उमेदवारांनी विज्ञान आणि विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजे ’तंत्रज्ञान’ मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळ्या ’आर्थिक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. हे समजून घेऊन हा घटक तयार करायला हवा. घटकवार अभ्यास कशा प्रकारे करायचा याबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये ऊर्जास्रोत, ऊर्जा संकट, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञान या घटकांची तयारी कशी करावी ते पाहू. 

Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?
Harsh Goenka shares video of new palm payment method in China Tech continues to simplify our lives
चीनमध्ये आता तळहात स्कॅन करून दिले जातात पैसे! ‘Palm Payment’चा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Pavan Davuluri IIT Madras graduate is new head Or Boss of Microsoft Windows and Surface
आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट विंडोजचे ठरले नवे बॉस; जाणून घ्या पवन दावुलुरीबद्दल

पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जास्रोत :

जिवाश्म इंधन आणि ज्वलन, औष्णिक, जलविद्युत शक्ती (भरती व लहरी शक्ती) तसेच सौर, पवन, समुद्रलाटा, भूऔष्णिक, जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपारिक ऊर्जास्रोत. उदा. ऊस पीक इत्यादीची उपउत्पादने या सर्वाचे प्रकार, स्वरूप, ऊर्जानिर्मिती प्रक्रिया यांमधील वैज्ञानिक संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांचे उपयोजन आणि त्यांचे महत्त्व समजून घ्यायला हवे. ऊर्जा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे आणि प्रक्रिया, तंत्रज्ञान मूलभूत माहिती करून घ्यायला हवी.

ऊर्जा रूपांतरणासाठी आवश्यक द्रव गतिशास्त्र अशी क्लिष्ट परिभाषा वापरली असली तरी त्यातील बर्नूलीचे समीकरण हा मूलभूत मुद्दा धरून त्याबाबत ऊर्जा रूपांतरणाचे तत्त्व समजून घ्यायला हवे. याबाबत गणितेही विचारली जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांचा सराव करणे आवश्यक आहे.

सौर साधने. सौर कूकर, पाणीतापक, सौर शुष्कयंत्र इत्यादी साधनांमागची वैज्ञानिक संकल्पना, प्रक्रिया, तंत्रज्ञान यांची मूलभूत माहिती करून घ्यावी.

भारतातील ऊर्जा संकट :

भारतातील ऊर्जा संकटाची सद्य:स्थिती समजून घेण्यासाठी ऊर्जेची गरज, वेगवेगळया क्षेत्रातील वापर, मागणी, उर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादी बाबतची आकडेवारी (टक्केवारी) भारत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून पाहायला हवी. भारतातील याबाबतच्या आकडेवारीत महाराष्ट्राचे स्थान माहीत असायला हवे. उर्जा निर्मिती, मागणी, वापर आणि पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा.

ऊर्जा निर्मितीसाठीचे कार्यक्रम, शासकीय धोरणे आणि विविध योजनांचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. त्यांची उद्दिष्टय़े, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांच्या आधारे तक्ता तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती आणि राजकीय पैलू इत्यांदीचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

वीज वितरण आणि विद्युतपुरवठा यंत्रणा- ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड सौर विद्युत घटप्रणाली या मुद्दय़ांचा मूलभूत वैज्ञानिक संकल्पना आणि या यंत्रणांचे स्वरूप, महत्त्व, समस्या, कारणे व उपाय अशा मुद्यांच्या आधारे अभ्यास करावा.

ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्थांचा अभ्यास करताना त्यांची स्थापना, उद्दिष्ट, नियंत्रक विभाग, कार्ये, मूल्यमापन असे मुद्दे लक्षात घ्यावेत. 

संगणक व माहिती तंत्रज्ञान :

संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अ‍ॅक्सेसरीज यांचे प्रकार, स्वरूप, उपयोजन यांचा आढावा घ्यावा.

कम्युनिकेशन नेटवर्किंग, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक/डायनमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग या संकल्पना समजून घेऊन त्यांचे उपयोजन कशा प्रकारे व कोणत्या क्षेत्रांमध्ये केले जाते ते समजून घ्यावे.

नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान- क्लाऊड कंप्यूटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन इत्यादींमागील तंत्रज्ञान समजून घ्यावे. त्याबाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.

इंटरनेट ऑफ थिंग्ज, आभासी वास्तव/ संवर्धित वास्तव, मेसेजिग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निग या बाबींचा विविध क्षेत्रातील वापर आणि त्याबाबतच्या समस्या, कारणे, उपाय समजून घ्यावेत.

नेटवर्क आणि माहिती सुरक्षेसाठीच्या फॉरेन्सिक, सायबर कायदा इत्यादींमधील महत्त्वाच्या तरतुदी, त्यांतील महत्त्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, गुन्ह्याचे स्वरूप व शिक्षा इत्यादींचा अभ्यास मूळ कायदा वाचून करायला हवा.

अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान :

अवकाश तंत्रज्ञान या घटकाचे ‘कालानुक्रमांवर’ आधारित tables  बऱ्याच संदर्भ साहित्यात सापडते. या  tables मध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाश याने, क्षेपणास्त्रे आणि विविध अवकाश प्रकल्प यांचा अभ्यास पूर्ण होईल. यातून या तंत्रज्ञानाचा ‘विकास’ कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल.

अवकाश कचरा हा मुद्दा स्वरूप, घटक, त्यांचे परिणाम, त्यावरील उपाययोजना अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावा.

कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामधील वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचा उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्यातून अभ्यासायला हव्यात.